Goa Traditional Utsav: रवळनाथ देवस्थानात अवसर उत्सव सुरु

Goa: श्री रवळनाथ देवस्थानचा पारंपरिक दसरोत्सवाला काल बुधवारपासून सुरुवात करण्यात आली.
Goa Traditional Utsav
Goa Traditional UtsavDainik Gomantak
Published on
Updated on

Valpoi: म्हाऊस-सत्तरी येथील श्री रवळनाथ देवस्थानचा पारंपरिक दसरोत्सवाला काल बुधवारपासून सुरुवात करण्यात आली. काल बुधवारी 5 पासून उत्सव सुरू झाला असून 6, 7 रोजी पर्यंत चालणार आहे. बुधवारी सकाळपासून हजारो भाविकांनी श्री रवळनाथ देवाचे दर्शन घेतले.

गावात साजरा होणाऱ्या प्रमुख सोहळ्यात सकाळपासून महत्त्वाचे विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. सकाळी देवांची पारंपरिक पद्धतीने पूजा, अर्चा करण्यात आली. तर दुपारी भाविकांनी देवदर्शन घेतले. अवसररुपी देवाच्या रूपातील भाविकांनी आशीर्वाद दिेले.

Goa Traditional Utsav
Goa Utsav: म्हापशात श्रीहनुमानाचे सीमोल्लंघन उत्साहात!

तसेच, तरंगोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. त्याचप्रमाणे भुताच्या बाधा होणाऱ्यांना देवाच्या आशीर्वाद देऊन तणावमुक्त करण्याचा कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत चालला.म्हाऊस गावाला या दसरोत्सवाच्या माध्यमातून महत्त्वाचे स्थान निर्माण झाले आहे.

वाळपई शहरापासून अवघ्या तीन कि.मी.अंतरावर असलेल्या या गावाला वेगळी अशी सांस्कृतिक परंपरा लाभली आहे. नवरात्रोत्सवाच्या माध्यमातून याची सुरुवात करण्यात येत असते. कारण नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी देवाची वेगवेगळ्या पद्धतीने पूजा करण्यात येते. प्रत्येक दिवशी देवाला नवीन माळ घालण्याची परंपरा रूढ आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Karapur One Goa Project Protest
Goa First Alliance 2027
Viresh Borkar RG Goa
Morjai Temple Property Misappropriation
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com