

वास्को: मुरगावातून कोळसा हद्दपार करणे ही काळाची गरज आहे. कोळसा प्रदूषणाचा फटका संपूर्ण मुरगाव तालुक्याला बसत असून, यावर एकच उपाय म्हणजे कोळसा कायमस्वरूपी मुरगावासह गोव्यातून हटविणे, असे गोवा फॉरवर्ड पक्षाचे सरचिटणीस दुर्गादास कामत यांनी सांगितले.
गोवा फॉरवर्ड पक्ष बळकट करणे हे आमचे प्रथम कर्तव्य आहे. यासाठी पक्षसंघटना मजबूत करून ‘ऑपरेशन विजय’ यशस्वी करण्यात येईल, असेही कामत यांनी सांगितले. सडा येथील आंबेडकर सभागृहात शुक्रवारी गोवा फॉरवर्ड पक्षाची मुरगाव गट समिती कामत यांनी जाहीर केली. अध्यक्षपदी माजी नगरसेवक निलेश नावेलकर यांची निवड करण्यात आली.
उपाध्यक्षपदी तुषार कुनीजा व रूपा रोहिदास नाईक, सरचिटणीसपदी विपूल मोरुडकर व जुबेर सय्यद, सचिवपदी लॅस्टर लॅन्डीज, निहाल शेख व शुभम पेडणेकर, तर खजिनदारपदी रोहन कसालकर यांची निवड करण्यात आली.
कार्यकारिणी सदस्य म्हणून तृप्ती सावंत, वंदना शेटकर, तन्वी सावंत, वैशाली पेडणेकर, चित्रा राऊळ, लक्ष्मी रेडकर, विनीता पेडणेकर, राधिका शेटकर, प्राजक्ता सावंत, मंजिरी नाईक, चेतन कंगरलकर, फिजान शेख, प्रसाद कवणेकर, विठ्ठल हळदणकर, महेश मेस्ता, मुजेब सय्यद, सनी पाशी, नसरुल्ला हुसेन शेख, हसन शेख, मौली शेख, शाहजहान शेख, हसन हंगल, नडीगरीप्पा हरीजन व मौलली मालदार यांची निवड करण्यात आली.
गटाध्यक्ष नीलेश नावेलकर यांनी सांगितले की, पक्षाचे कार्य सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जातील. मुरगावात कोळसा प्रदूषणामुळे विविध आजारांचे प्रमाण वाढत चालले असून, यासाठी मुरगाव बंदर प्रदूषणमुक्त करणे आवश्यक आहे. मात्र, येथील लोकप्रतिनिधी कोळसा वाहतुकीला चालना देण्यासाठी पुढाकार घेत असून विकासाच्या नावाखाली मुरगाववासीयांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.