Goa Forward: दादागिरी करणाऱ्यांवर कारवाई करा! गोवा फॉरवर्डची मागणी; राज्‍य निवडणूक आयोगाला 24 तासांची मुदत

Gaondongri Controversy: गोवा फॉरवर्डने पैंगीणमधील बैठकीसाठी आचारसंहिता लागू होण्‍याआधीच २६ नोव्‍हेंबरला परवानगी घेतली होती. ध्वनी परवानगीसाठी उपजिल्‍हाधिकाऱ्यांकडे परवानगी मागितली होती.
Goa Forward
Goa Forward Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: पैंगीणमध्‍ये गावडोंगरी येथे आयोजित गोवा फॉरवर्डच्‍या बैठकीला आक्षेप घेणाऱ्या उपजिल्‍हाधिकारी प्रतापराव नाईक गावकर आणि सहाय्‍यक निवडणूक अधिकारी विपुल नाईक गावकर या दोघांची तत्‍काळ बदली करावी तसेच बैठकीत येऊन दादागिरी करणाऱ्या निरीक्षक हरीष राऊत यांच्‍यावर चोवीस तासांत कारवाई करावी, अशी मागणी गोवा फॉरवर्डच्‍या शिष्‍टमंडळाने सोमवारी राज्‍य निवडणूक आयुक्तांकडे केली.

गोवा फॉरवर्डचे उपाध्‍यक्ष दिलीप प्रभुदेसाई, प्रवक्‍ते विकास भगत आदींच्‍या शिष्‍टमंडळाने राज्‍य निवडणूक आयुक्त मिनिनो डिसोझा यांची भेट घेत, २९ नोव्‍हेंबर रोजी पैंगीणमध्‍ये घडलेल्‍या घटनेचा निषेध नोंदवला.

Goa Forward
Goa Forward: 'पोलिस आले, त्‍यांनी व्यासपीठावर जाऊन माईक बंद केला'! गावडोंगरीत अधिकाऱ्यांनी हलगर्जी केल्‍याचा गोवा फॉरवर्डचा दावा

गोवा फॉरवर्डने पैंगीणमधील बैठकीसाठी आचारसंहिता लागू होण्‍याआधीच २६ नोव्‍हेंबरला परवानगी घेतली होती. ध्वनी परवानगीसाठी उपजिल्‍हाधिकाऱ्यांकडे परवानगी मागितली होती. परंतु, त्‍यांनी त्‍यासाठी सहाय्‍यक निवडणूक अधिकाऱ्यांची परवानगी घेण्‍यास सांगितले.

Goa Forward
Goa Forward: गोवा फॉरवर्डची ‘आमचो आवाज विजय’ मोहीम! जाणून घेणार लोकांचे प्रश्‍न; पेडण्यातून होणार सुरुवात

त्‍यानुसार तसा अर्ज आम्‍ही निवडणूक अधिकाऱ्यांना केला होता. त्‍यानंतरच २९ ला बैठकीचे आयोजन केले. परंतु, बैठक सुरू झाल्‍यानंतर पाऊण तासांनी तेथे येऊन निरीक्षक राऊत यांनी आचारसंहितेचा भंगचा ठपका ठेवत बैठक बंद करण्‍याचे निर्देश दिले. या तिघांनीच आचारसंहितेचा भंग केलेला आहे, असे विकास भगत म्‍हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Assembly Elections 2027
mumbai high court goa bench
New Casino Vessel Permission
Goa Ganesh Idol Vendor Registration
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com