

पणजी: कमी पावसामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना गरज भासल्यास सरकारकडून नुकसानभरपाई दिली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे. पावसाअभावी प्रभावित झालेल्या कृषी क्षेत्राचा सविस्तर पंचनामा करण्याचे निर्देश कृषी संचालकांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले असून, त्यासाठी आवश्यक परिपत्रकही जारी करण्यात आले आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी बुधवारी दिली. शेतकऱ्यांना आवश्यक त्या सूचनाही करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
पाऊस २० जुलैनंतर पूर्वपदावर शक्य:
सध्या मान्सूनचे ढग पुन्हा पूर्वेकडून पश्चिमेकडे सरकू लागले आहेत. गोवा वेधशाळेच्या हवामान तज्ज्ञांनी २० जुलैनंतर राज्यात पुन्हा पाऊस सामान्य होण्याची शक्यता वर्तवली आहे.
पंचांग ‘करेक्ट’
पणजीतील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘पंचांगामध्ये यंदा पाऊस उशिरा येणार, हे सांगितले होते. ‘एल निनो’बाबतही पंचांगात मांडणी करण्यात आली आहे. त्यामुळे संस्कृत आणि पुरातन ज्ञानशाखांचे अवलोकन आजच्या काळातही उपयुक्त ठरत असल्याचे सिद्ध होते.’’
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.