P. Chidambaram
P. ChidambaramDainik Gomanatk

Goa Election कॉंग्रेस शेवटचा उमेदवार लवकरच घोषित करेल: पी. चिदंबरम

गोवा विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसने 37 पैकी 36 उमेदवारांची घोषणा केली आहे.
Published on

आगामी गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसने आतापर्यंत 36 उमेदवार घोषित केले आहेत. याबाबत पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी रविवारी सांगितले की, गोवा विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाने 37 पैकी 36 उमेदवारांची घोषणा केली आहे आणि शेवटचा उमेदवारही लवकरच घोषित केला जाईल. काल आम्ही सर्व 36 उमेदवारांना भेटलो.

P. Chidambaram
प्रतापसिंग राणे निवडणूक लढवणार नसतील तर....: पी. चिदंबरम

पी चिदंबरम (P Chidambaram) पुढे म्हणाले, उमेदवारांनी वचन दिले आहे की निवडून आल्यास ते एकजूट राहतील आणि सदस्य म्हणून पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करतील. ते कॉंग्रेस पक्षाची साथ सोडणार नाहीत. गोव्यात कॉंग्रेस पक्ष "एकजुटीने" लढेल आणि आगामी विधानसभा निवडणुकीत गोव्यातील जनता काँग्रेस पक्षावर विश्वास दाखवून त्यांचे सरकार निवडून देईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

P. Chidambaram
मोरजीवासीयांनी 'त्या' पार्टीच्या विरोधात आवाज उठवला

कॉंग्रेस (Congress) गोव्यात मुख्यमंत्री चेहरा कधी घोषित करणार, असा प्रश्न विचारल्यावर चिदंबरम म्हणाले, आम्ही निवडणूक अर्ज भरण्याचा प्रक्रियेनंतर सर्व उमेदवारांचा सल्ला घेऊ. त्यांचे सल्ले आम्ही कॉंग्रेस पार्टीच्या वरिष्ट नेत्यांपर्यंत पोचवू. उमेदवारांच्या सल्ल्यानुसार आम्ही निवडणुकीपूर्वी कींवा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री चेहरा घोषित करू.

गोव्यात (Goa) 14 फेब्रुवारीला विधानसभा निवडणूक होणार आहे. मतमोजणी 10 मार्चला होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com