प्रतापसिंग राणे निवडणूक लढवणार नसतील तर....: पी. चिदंबरम

ज्येष्ठ काँग्रेस नेते प्रतापसिंग राणे यांना पर्ये मतदारसंघातून कॉंग्रेसची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
P. Chidambaram
P. Chidambaram Dainik Gomantak

पणजी: आगामी गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष उमेदवार जाहीर करत आहेत. कॉंग्रेसने देखील विविध मतदारसंघात आपले उमेदवार जाहीर केले आहेत. ज्येष्ठ काँग्रेस नेते प्रतापसिंग राणे यांना पर्ये मतदारसंघातून कॉंग्रेसची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी मुकुल वासनिक एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही घोषणा केली होती.

P. Chidambaram
मोरजीवासीयांनी 'त्या' पार्टीच्या विरोधात आवाज उठवला

मात्र, प्रतापसिंग राणे पर्ये मतदारसंघातून निवडणूक लढणार का याबद्दल अजून स्पष्टता नाही. निवडणूक अर्ज भरण्याची मुदत सुरू झाल्याने प्रतापसिंग राणे काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना काँग्रेसचे (Congress) वरिष्ठ निवडणूक निरीक्षक पी. चिदंबरम म्हणाले, काँग्रेस पर्येतील उमेदवार 1-2 दिवसांत ठरवेल. पक्षाने आधीच प्रतापसिंग राणे यांना उमेदवारी घोषित केली आहे. राणे निवडणूक (Election) लढवणार नसतील तर त्यांनी पर्येत पर्यायी उमेदवार द्यावा.

P. Chidambaram
Goa Rain Update: राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी...

प्रतापसिंग राणे यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी राज्य सरकारने त्यांना आजीवन कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा जाहीर केला आहे. मात्र या बद्दल विचारले असता राणे म्हणाले होते की, मी कॅबिनेट मंत्रिपदाच्या दर्जाची कधीच मागणी केली नव्हती. गोवा (Goa) सरकारने जरी कॅबिनेट दर्जा जाहीर केला असला तरी आपल्याला याबाबत काही माहिती नसल्याचंही त्यांनी सांगितलं.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com