काँग्रेस आता कोणताही धोका पत्करणार नाही: पी. चिदंबरम

पिळगाव येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पी. चिदंबरम यांची ग्वाही
पिळगाव येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पी. चिदंबरम
पिळगाव येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पी. चिदंबरमDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Election 2022: गेल्या निवडणुकीनंतर काँग्रेसने बराच अनुभव घेतलेला आहे. आता काँग्रेस कोणताही धोका पत्करणार नाही. यापुढे काँग्रेस जनतेला हवे तेच उमेदवार आणि सरकार देणार, अशी ग्वाही काँग्रेसचे राष्ट्रीय नेते तथा मुख्य निवडणूक निरीक्षक पी. चिदंबरम (Congress National Leader P. Chidambaram) यांनी पिळगाव (Pilgaon) येथे बोलताना देवून कार्यकर्त्यांनी काँग्रेस उमेदवारांच्या विजयासाठी पाठीशी भक्कमपणे कार्यरत रहावे, असे आवाहन केले. मये मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पी. चिदंबरम बोलत होते.

पिळगाव येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पी. चिदंबरम
माझी उमेदवारी भाजपा ठरवेल, सुधीन ढवळीकर ठरवणारे कोण?

काँग्रेस पक्षाला मोठा इतिहास असून, काँग्रेसच्या इतिहासाकडे पाहिल्यास या पक्षाचे कार्य समोर येते. नोकऱ्या कशा निर्माण कराव्यात. त्याचे पूर्ण ज्ञान आणि अभ्यास असलेला काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे. असे पी. चिदंबरम म्हणाले. भाजप सरकारच्या कार्यकाळात जनता सुरक्षित नाही. महागाईने तर कळस गाठला आहे. बेरोजगारीची समस्या तर भयानक आहे. अशी टीका पी. चिदंबरम यांनी यावेळी करून, काँग्रेसला सत्तेवर आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी संघटितपणे कार्य करावे. असे आवाहन केले.

वरगाव-पिळगावच्या श्री चामुंडेश्वरी देवस्थान सभागृहात आयोजित केलेल्या कार्यकर्ता बैठकीस काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा पर्येचे आमदार प्रतापसिंह राणे, गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीष चोडणकर, माजी मंत्री संगीता परब, माजी आमदार धर्मा चोडणकर, मयेचे प्रभारी प्रा. अनंत पिसूर्लेकर, काँग्रेसचे उत्तर गोवा अध्यक्ष विजय भिके, मयेचे संभाव्य उमेदवार ऍड. अजय प्रभूगावकर, गोवा प्रदेश काँग्रेसचे सचिव खेमलो सावंत, मये गट काँग्रेसचे अध्यक्ष राजेश गावकर, महिला अध्यक्ष अपर्णा राणे सरदेसाई आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना प्रतापसिंह राणे यांनी भाजप सरकार सर्व आघाड्यावर अपयशी ठरल्याची टीका केली.

काँग्रेस हा सर्व धर्म समभाव जोपासणारा पक्ष आहे. काँग्रेसला जर गतवैभव प्राप्त करून द्यायचे असल्यास सर्व कार्यकर्त्यांनी संघटीतपणे कार्य करण्याची गरज असल्याचे मत धर्मा चोडणकर यांनी व्यक्त केले. संगीता परब यांनी यावेळी महागाई, रस्त्यांची दुर्दशा आदी प्रश्नांवरुन भाजपवर टीका केली काँग्रेसला सर्वत्र अनुकूल वातावरण असल्याचे त्या म्हणाल्या.

पिळगाव येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पी. चिदंबरम
राज्यपाल निधीतून गरजूंना मदत करण्याची राज्यपालांची घोषणा

गद्दारांना दारे बंद

काँग्रेसशी गद्दारी केलेल्या आमदारांना यापुढे काँग्रेसमध्ये प्रवेश नाही. गद्दारांसाठी काँग्रेसची दारे बंद. या निर्णयाशी काँग्रेस ठाम असल्याचे गिरीष चोडणकर यांनी नमूद करून भाजप सरकारने जनतेची फसवणूक केली आहे. अशी टीका केली. आगामी निवडणुकीत राज्यात काँग्रेसचेच सरकार सत्तेवर येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यकर्त्यांकडून सूचना

विकासात्मक धोरण राबवितानाच पक्षाने जनतेच्याही समस्यांचा विचार करावा. अशी सुचना ऍड.अजय प्रभूगावकर यांनी केले. संदीप निगळ्ये, दिलीप गावस, आदी काही नागरिकांनी विविध सुचना करून काँग्रेसने जनतेवर उमेदवार लादू नये. अशी मागणी केली. फुटीरां विरोधात काँग्रेसने कडक धोरण अंबलावे. अशी मागणी अमन यांनी केली. राजेश गावकर यांनी स्वागत केले. जान्हवी धुरी हिने सूत्रसंचालन केले. संदीप माईणकर यांनी आभार मानले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com