Goa: राज्यपाल निधीतून (Governor Fund) गोव्यातील (Goa) गरजु व गोरगरिबांना मदत (helps Needy and poor people) करण्याची घोषणा राज्पपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई (Governor P. S. Sreedharan Pillai) यानी आज मडगावी (Margao) केली. फातर्पा येथील मिशनरीस ऑफ चॅरिटी, मडगावी लार द सांता तेरेझिना व मातृछाया बालिका कल्याण आश्रम नंतर त्यानी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाला भेट दिली. या भेटी नंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील घोषणा केली.
राज्यपालांनी आज तीनही ठिकाणी प्रत्येकी एक लाख रुपयाची आर्थिक मदत दिली. तसेच एका डायलिसिस रुग्णाला 25 हजार रुपयांची मदत दिली. प्रधानंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा प्रित्यर्थ त्यानी 71 रुग्णांना मदत करण्याची घोषणा केली. त्यासाठी आपण अधिकाऱ्यांना गरजु रुग्णांची एक यादी तयार करायला सांगितल्याचे राज्यपालांनी सांगितले.
राज्यपाल हा केवळ राजभवनात बसुन राहु शकत नाही. त्यानी लोकांशी संपर्क साधावा, त्यांच्या गरजा, त्यांचे प्रश्र्न समजुन घ्यावे व अशा सामान्य लोकांशी संपर्क साधणे हे आपले कर्तव्य असल्याचे राज्यपाल पिल्लई यानी सांगितले. एका वर्षांत मी गोव्यातील सर्व अनाथालयांना व समाजासाठी मदतकार्य करणाऱ्या संस्थांना भेटी देणार असल्याचे त्यानी या प्रसंगी सांगितले.
गरजवंताना, गोरगरिबांना मदत करणे हीच परमेश्र्वर सेवा असे आपण मानतो असेही राज्यपालांनी सांगितले. समाजातील शेवटच्या माणसाच्या अन्न, निवारा, पाणी, वीज, कपडे सारख्या मुलभुत गरजा पुर्ण होणार तेव्हाच भारत खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाला असे म्हणावे लागेल असेही राज्यपाल म्हणाले. गोव्यातील आरोग्य सेवेची त्यानी प्रशंसा केली. येथे देशातील उच्च दर्जाची सेवा देण्यात येते असे ते म्हणाले. सरकारने तंदुरुस्त आरोग्यासाठी सर्व साधन सुविधा उपलब्ध केल्याचे त्यानी सांगितले.
गोवा हा इतर राज्यांपेक्षा खूप वेगळा आहे. येथील दरडोई उत्पन्न इतर राज्यांपेक्षा चांगले असल्याचेही त्यानी सांगितले. आरोग्य खात्याच्या संचालिका डॉ. इरा आस्मेदा व दक्षिण जिल्हा इस्पितळाच्या प्रमुख डॉ, दिपा कुर्रैया आफोंसो यांनी राज्यपालांना इस्पितळातील वेगवेगळ्या विभागांची माहिती दिली तसेच राज्यपालांनी ऑक्सिजन प्लांटचीही पाहणी केली. या प्रसंगी दक्षिण गोव्याचे अतिरिक्त उपजिल्हाधिकारी संजीत रॉड्रिग्स उपस्थित होते.
मडगावी लार द सांता तेरेझिना येथे आमदार दिगंबर कामत, अनाथाश्रयाचे संचालक फा. सिल्वेस्टर डिसोझा यांनी राज्यपालांचे स्वागत केले. या वेळी अनाथाश्रयाच्या मुलींनी नृत्य व गाणे सादर केले. मातृछाया बालिका कल्याण आश्रमात राज्यपालांचे स्वागत आमदार विजय सरदेसाई, मातृछायेचे चेअरमन श्रीनिवास धेंपे व व्यवस्थापन पदाधिकाऱ्यांनी केले.
राजभवन आयटीआर म्हणजेच माहिती हक्क कायद्याखाली आणण्याचा निर्णय घेतल्याने आमदार सरदेसाई यानी राज्यपालांचे अभिनंदन केले. राज्यपाल पारदर्शक व सक्रिय असावे असे सरदेसाई म्हणाले. ही संस्था सांस्कृतिक मुल्यांचे तसेच देशाची व गोव्याच्या परंपरेचे जतन करते असे धेंपो यानी आपल्या स्वागतपर भाषणात सांगितले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.