माझी उमेदवारी भाजपा ठरवेल, सुधीन ढवळीकर ठरवणारे कोण?

सुधीन ढवळीकर (Sudin Dhavalikar) आपली उमेदवारी ठरवणारे आणि नाकारणारे कोण असा सवाल सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पावसकर (Public Works Minister Deepak Pawaskar) यांनी विचारला आहे.
Public Works Minister Deepak Pawaskar
Public Works Minister Deepak PawaskarDainik Gomantak
Published on
Updated on

मोरजी: माझी उमेदवारी हि भाजपा पक्ष ठरवणार आहे आणि ती उमेदवारी आपल्यालाच मिळेल असा विश्वास व्यक्त करुन, सुधीन ढवळीकर (Sudin Dhavalikar) आपली उमेदवारी ठरवणारे आणि नाकारणारे कोण असा सवाल सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पावसकर (Public Works Minister Deepak Pawaskar) यांनी कोरगाव येथे 13 रोजी एका कार्यक्रमाला आल्यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले.

मंत्री दीपक पावसकर यांनी पुढे बोलताना आता पर्यंत भाजपा सरकारने केलेले कार्य गोमंतकीयांच्या मनात आहे त्यामुळे 2022 च्या निवडणुकीत भाजपाचे 22 आमदार निवडून येतील आणि ते 30 पर्यंत होतील असा दावा करून भाजपची उमेदवारी हि आपल्यालाच मिळणार आहे.

मगो आणि भाजपा युती झाली तर ती उमेदवारी तुम्हाला मिळेल का असा प्रश्न विचारला असता ते बोलत होते. शिवाय सुधीन ढवळीकर यांनी दीपक पावसकर बाबू आजगावकर (Babu Azgavkar) आणि मंत्री गोविंद गावडे (Minister Govind Gawde) याना भाजपने उमेदवारी देवू नये असा प्रस्थाव भाजपाकडे दिला आणि तो मान्य झाला तरच मगो भाजपा युती होवू शकते असे वृत्त सामाजिक माध्यमातून पसरल्याने मंत्री दीपक पावसकर (Deepak Pawaskar) याना या विषयी छेडले असता ते बिन्दास्त बोलत होते.

Public Works Minister Deepak Pawaskar
Goa Election: ढवळीकर-फडणवीस भेटीने मगो-भाजप युतीची चर्चा

खड्डे 1 नोव्हेंबर पूर्वीचे

मंत्री दीपक पावसकर यांनी रस्त्यावरील खड्डे 1 नोव्हेंबर पूर्वी बुजवण्याचे आदेश एकूण 12 बाराही तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्याचे सांगून यंदा 125 इंच पावूस लागल्यामुळे खड्डे बुजवताना अडचणी आल्या , या काळात पावसाने उपकार करावेत अशी प्रार्थना करून 1 नोव्हेंबर पूर्वीच खड्डे बुजवले जातील असे त्यांनी सांगितले. शिवाय पेडणे तालुक्यातील पाण्याची समस्या सोडवण्याचा आपला प्रयत्न असणार असे म्हटले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com