Goa Education Department: शैक्षणिक संस्थांत धार्मिक, जातीय ज्ञान देण्यास लगाम! नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संस्थांवर कारवाई, शिक्षण खात्याचे परिपत्रक

Goa Schools Religious Activities Ban: शाळांमध्ये जाऊन धार्मिक, जातीय ज्ञान देण्यास शिक्षण खात्याने पूर्णपणे लगाम घातला आहे.
Goa Schools Religious Activities Ban
Goa Education DepartmentDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: शाळांमध्ये जाऊन धार्मिक, जातीय ज्ञान देण्यास शिक्षण खात्याने पूर्णपणे लगाम घातला आहे. खात्याने त्याबाबतचे परिपत्रक जारी करीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शिक्षण संस्थांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे.

‘स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया’ ही संघटना काही शैक्षणिक संस्थांमध्ये कार्यक्रम आयोजित करून विद्यार्थ्यांना धार्मिक ज्ञान देत असल्याची चिंता व्यक्त करणारे पत्र उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी शिक्षण खात्याला पाठवले होते. सामाजिक सलोख्याला बाधा पोहोचण्याची भीती

Goa Schools Religious Activities Ban
Goa Education: राज्‍यात १९ विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक! 'युडीआयएसई प्‍लस'च्या अहवालातून शिक्षण क्षेत्रातील मोठी आकडेवारी समोर

अशा उपक्रमांमुळे राष्ट्रीय सुरक्षा आणि सामाजिक सलोख्याला बाधा पोहोचण्याची भीतीही पत्रातून व्यक्त करण्यात आली होती. या पत्राची दखल घेत शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी परिपत्रक जारी करीत शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक, जातीय ज्ञान देण्यास पूर्णपणे बंदी घातली आहे. राज्य शालेय शिक्षण अधिनियम, १९८४ आणि नियम, १९८६ नुसार शाळांमध्ये विद्यार्थ्यांना धार्मिक, जातीय ज्ञान किंवा गैर-शैक्षणिक उपक्रम राबवता येणार नाहीत.

  शिक्षण खात्याने दिले निर्देश

सक्षम प्राधिकरणाची पूर्वलेखी परवानगी घेतल्याशिवाय कोणत्याही बाह्य व्यक्ती, संस्था किंवा गटाला विद्यार्थ्यांसोबत कोणताही परिसंवाद, व्याख्यान, जागरूकता कार्यक्रम किंवा संवाद आयोजित करण्याची परवानगी दिली जाणार नाही.

Goa Schools Religious Activities Ban
Goa Education: अनुदानित शाळांतील विद्यार्थी संख्‍येत घट; विनाअनुदानित शाळांतील संख्‍येत मात्र सातत्‍याने होतेय वाढ

अशा कार्यक्रमाला मंजुरी मिळवण्यासाठी विनंती अर्जासोबत संस्थेची ओळखपत्रे, वक्त्यांची नावे व त्यांची माहिती, नियोजित व्याख्यान किंवा उपक्रमाचा लिखित मसुदा यांची माहिती देणे बंधनकारक राहील.  कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर संस्थाप्रमुखांना शिक्षण खात्याला संक्षिप्त अहवाल सादर करावा लागेल. त्यात आयोजित कार्यक्रमाचे स्वरूप, प्रमुख मुद्द्यांवरील चर्चेची माहिती द्यावी लागेल. तसेच कार्यक्रमात कोणतीही आक्षेपार्ह, अनधिकृत सामग्री नव्हती, याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com