

पणजी: राज्यातील सरकारी आणि अनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या संख्येत घट होत असून, विनाअनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या मात्र वाढत असल्याचे राज्य सरकारने जारी केलेल्या एका अहवालातून समोर आले आहे.
राज्य सरकारने २०२०–२१ ते २०२५–२६ या काळातील जो अहवाल सादर केलेला आहे, त्यातून माध्यमिक (पाचवी ते सातवी), माध्यमिक (आठवी ते दहावी) आणि उच्च माध्यमिक (अकरावी ते बारावी) यातील सरकारी आणि अनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांचा आकडा घटत चाललेला आहे. पण, विनाअनुदानित शाळांत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत असल्याचे स्पष्टपणे दिसून येते.
पाचवी ते सातवी या इयत्तांच्या आकडेवारीकडे लक्ष दिल्यास, २०२०–२१ च्या तुलनेत २०२५–२६ मध्ये सरकारी शाळांतील विद्यार्थी संख्येत आठ, अनुदानित शाळांतील संख्येत १,७८३ ने घट झाली. तर, या काळात अनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या १,५१८ ने वाढली.
आठवी ते दहावीपर्यंतच्या सरकारी शाळांतील विद्यार्थी संख्या या काळात ५३४, तर अनुदानितमधील संख्या २,५४६ ने घटली. पण, अनुदानित शाळांतील संख्या १,१४८ ने वाढली. तर, अकरावी आणि बारावीपर्यंतच्या सरकारी शाळांतील संख्या ६४३ आणि अनुदानित शाळांतील संख्या ८३३ ने घटली. तर, विनाअनुदानित शाळांतील संख्या मात्र ९२४ ने वाढल्याचे दिसून येते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.