Goa Education: राज्‍यात १९ विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक! 'युडीआयएसई प्‍लस'च्या अहवालातून शिक्षण क्षेत्रातील मोठी आकडेवारी समोर

Goa Student Teacher Ratio: २०२५–२६ मध्‍ये राज्‍यात ज्‍या १,४७३ शाळा कार्यरत होत्‍या, त्‍यांमध्‍ये ४४,८७,६५१ पुस्‍तके होती, असे अहवालात म्‍हटले आहे.
Goa Student Teacher Ratio
Goa EducationDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : राज्‍यात १९ विद्यार्थ्यांमध्‍ये एक शिक्षक कार्यरत असून विद्यार्थी–शिक्षक प्रमाणात इतर छोट्या राज्‍यांच्‍या तुलनेत गोव्‍यातील स्‍थिती समाधानकारक असल्‍याचे २०२५–२६ च्‍या ‘युडीआयएसई प्‍लस’ अहवालातून समोर आले आहे. २०२५–२६ या शैक्षणिक वर्षात राज्‍यात पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्‍यमिक आणि उच्च माध्‍यमिक अशा एकूण १,४७३ शाळा सुरू होत्‍या.

या शाळांमध्‍ये २,९७,३३७ विद्यार्थी शिकत होते, तर त्‍या शाळांतील शिक्षकांची संख्‍या १५,९६५ इतकी होती. यातून १९ विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक कार्यरत होता, असे अहवालातून दिसून येते. या आकडेवारीनुसार, प्रत्‍येक शाळेत सरासरी ११ शिक्षक होते, तर सरासरी २०० विद्यार्थी प्रत्‍येक शाळेत शिकत असल्‍याचेही दिसून येते. दरम्‍यान, छोट्या राज्‍यांचा विचार केल्‍यास सिक्‍कीममध्‍ये या वर्षात १,२१३ शाळा सुरू होत्‍या.

Goa Student Teacher Ratio
BITS Pilani Student Suicide: आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचा मृतदेह वडिलांनी घेतला ताब्यात, केरळमध्ये होणार अंत्यसंस्कार; आत्महत्येचे कारण अस्पष्ट

त्‍यातील विद्यार्थ्यांची संख्‍या १,१५,६५८ आणि शिक्षकांची संख्‍या १५,१८२ इतकी होती. यातून सिक्‍कीममध्‍ये या विद्यार्थी–शिक्षकांचे प्रमाण ८ इतके होते. मिझोरममध्‍ये या काळात ३,९६५ शाळा होत्‍या. त्‍यात २,८४,२७० विद्यार्थी शिक्षण घेत होते, तर त्‍यांना २५,२८२ शिक्षक शिकवत होते. तेथे विद्यार्थी–शिक्षक प्रमाण ११ इतके होते.

नागालँडमध्‍ये २,७१५ शाळा सुरू होत्‍या. तेथे ४,०७,३७९ विद्यार्थी आणि ३३,१३८ शिक्षक कार्यरत होते. यातून नागालँडमध्‍ये १२ विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक होता, हे स्‍पष्‍ट होते. विद्यार्थी आणि शिक्षकांच्‍या संख्‍येचा विचार केल्‍यास लहान राज्‍यांमध्‍ये गोव्‍याची स्‍थिती समाधानकारक असल्‍याचे अहवालातील आकडेवारीतून दिसून येते.

Goa Student Teacher Ratio
School Committee: फोंडा हेडगेवार विद्यालयात पालक-शिक्षक संघाची निवड

एका शाळेत सरासरी ३,०४७ पुस्‍तके

२०२५–२६ मध्‍ये राज्‍यात ज्‍या १,४७३ शाळा कार्यरत होत्‍या, त्‍यांमध्‍ये ४४,८७,६५१ पुस्‍तके होती, असे अहवालात म्‍हटले आहे. यातून एका शाळेत सरासरी ३,०४७ इतकी पुस्‍तके असल्‍याचे स्‍पष्‍ट होते. सरकारने गेल्‍या काही वर्षांपासून सर्वच शाळांत पुस्‍तकांची संख्‍या वाढवण्‍यास सुरुवात केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com