Goa Curfew
Goa CurfewDainik Goamantak

Goa Curfew: कसिनो व्यावसायिक Unlock च्या प्रतिक्षेतच

गोवा कर्फ्यू येत्या 6 सप्टेंबरपर्यंत सकाळी 7 वाजेपर्यंत लागू राहणार आहे.
Published on

पणजी: कोविड - 19 च्या (Covid-19) पार्श्‍वभूमीवर सरकारने (Goa Government) पुन्हा आठवडाभर राज्यव्यापी संचारबंदीत (Goa Curfew) वाढ केली आहे. हा कर्फ्यू येत्या 6 सप्टेंबरपर्यंत सकाळी 7 वाजेपर्यंत लागू राहणार आहे. त्यामुळे कसिनो सुरू होतील अशी अपेक्षा असलेल्या कसिनो व्यावसायिकांना आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी मागील आदेश कायम ठेवण्यात असल्याचा एका ओळीचा आदेश जारी केला आहे.

Goa Curfew
Goa: यंदा दहीहंडीला परवानगी मिळणार का?

राज्यस्तरीय संचारबंदी (कर्फ्यू) लागू असला तरी किनारपट्टी भागात पर्यटकांची झालेल्या गर्दीमुळे त्याचा फज्जा उडाला आहे. शनिवार व रविवारी या सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात पर्यटक गोव्यात येऊ लागले आहेत. सरकारने लागू केलेली मार्गदर्शक सूचनांचे पालन केले जात नाही व पोलिसही त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. चेकनाक्यावरही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. राज्याबाहेरून येणाऱ्या प्रवासी बसेसमधील प्रवाशांच्या कोरोना चाचणी केल्याशिवाय पैसे घेऊन प्रवेश दिला जात आहे.

Goa Curfew
Goa: समुद्र किनाऱ्यावर कोरोना नियम धाब्यावर

राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता धरून सरकारने सावधगिरी बाळगण्याचे प्रयत्न सुरू केले असल्याचे घोषित केले असले तरी ती कागदावरच आहे असे चित्र सर्वत्र दिसत आहे. गणेश चतुर्थी जवळ पोहचल्याने बाजारपेठामध्ये लोकांची गर्दी वाढू लागली आहे व त्यावर नियंत्रण ठेवणे अशक्यप्राय बनले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com