पणजी: राज्यात सध्या कोरोना (Covid-19) नियंत्रणात असला, तरी संचारबंदी मात्र लागू आहे. नियम (Rules) पाळावेत, असे सरकारकडून (government) आवाहन केले जात आहे. पर्यटकांची (tourists) मनमानी वाढल्याने चिंता वाढली.
याशिवाय शेजारील राज्यात कोरोनाचे नवे व्हेरियंटही (New variants of the Corona) आढळत असल्याने स्थिती बिनधास्त वागण्याासारखी नाही, असे चित्र रविवारी गर्दीने फुललेल्या समुद्र किनाऱ्यांनी (The beach) पुन्हा चिंता वाढविली आहे. या किनाऱ्यांवर ७० टक्के पेक्षा जास्त पर्यटक मास्कचा वापर करताना दिसत नाहीत. ‘एसओपी’च्या उल्लंघनामुळे कोरोनाचा धोका वाढण्याची भीती आहे. मार्चपासून सुरु झालेली कोरोनाची दुसरी लाट अद्यापही सुरूच आहे.
गर्दीकडे लक्ष नाही का?
महाराष्ट्र आणि कर्नाटकात ‘डेल्टा प्लस’ चे व्हेरियंट मिळाले आहेत, तरीही राज्य सरकार याकडे गांभीर्यने पाहताना दिसत नाही. राज्यातील किनाऱ्यांवर पर्यटकांनी मोठी गर्दी पाहिल्यानंतर चिंता वाढणार असे असतान ‘एसओपी’ चे पालन होते की नाही, हे पाहणारे कुठे आहेत, असा प्रश्न निर्माण होत आहे.
‘चतुर्थी’ अलर्ट
कोविड रूग्णांची संख्या कमी होत आहे. परंतु कोविड संपलेला नाही. तेव्हा जनतेने काळजी घ्यावी. एसओपीचे पालन करावे. आपली यंत्रणा सज्ज आहे, पण सर्वांनी नियमांचे पालन करा. लहान मुले, वृद्धांची काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच गणेशचतुर्थी काळातही जागृत रहाणे गरजेच आहे, असे मत मुख्यमंत्री डॉ. सावंत बेतकी येथे आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या शिलान्यासप्रसंगी व्यक्त केले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.