Goa: यंदा दहीहंडीला परवानगी मिळणार का?

महानगरपालिकेचे (Panaji Municipal Corporation) जिल्हाधिकाऱ्यांकडे बोट, दरवर्षी तरूणाईत दहीहंडीचा जोष असतो, तो गेल्यावर्षीपासून मावळल्याचे चित्र आहे.
यंदाही ३० तारखेपर्यंत संचारबंदी लागू असल्याने दहीहंडी फुटणार की नाही, या संभ्रमात गोमंतकीय आहेत.
यंदाही ३० तारखेपर्यंत संचारबंदी लागू असल्याने दहीहंडी फुटणार की नाही, या संभ्रमात गोमंतकीय आहेत.Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गणेश चतुर्थीच्या आधी येणाऱ्या दहीहंडीची (dahihandi) पर्वणी साधणासाठी गोमंतकीय नेहमीच उत्‍सूक असतात. गतवर्षी मर्यादित मंदिरात दहीहंडीला परवानगी (dahihandi is allowed in limited temples) देण्यात आली होती. यंदाही ३० तारखेपर्यंत संचारबंदी लागू असल्याने दहीहंडी फुटणार की नाही, या संभ्रमात गोमंतकीय आहेत. अद्याप तरी जिल्हाधिकाऱ्यांनी (the Collector) याबाबत खुलासा केलेला नाही. याबाबत आज निर्णय होण्याची शक्यता आहे.

काही नागरिकांनी याबाबत पणजी महानगरपालिकेकडे (Panaji Municipal Corporation) विचारणा केली असता महापालिकेने जिल्हाधिकाऱ्यांकडे बोट दाखवत अंग काढून घेतले. त्यामुळे यंदाही दहीहंडीला ब्रेक लागणार हे नक्की झाले आहे. दरवर्षी तरूणाईत दहीहंडीचा जोष असतो, तो गेल्यावर्षीपासून मावळल्याचे चित्र आहे.

यंदाही ३० तारखेपर्यंत संचारबंदी लागू असल्याने दहीहंडी फुटणार की नाही, या संभ्रमात गोमंतकीय आहेत.
Goa: कागदाच्या लगद्यापासून गणेशमूर्ती घडविणारे मनोज

राजकीय नेते त्यांच्या प्रचारासाठी शेकडोंचा जमाव जमवत आहेत. सरकारमधील नेतेही गावागावात मेळावे भरवत आहेत. त्यामुळे कोविडचा फैलाव होत नाही का? लोकांचा निरूत्साह करण्याचा हा सरकार आणि प्रशासनाचा प्रयत्‍न आहे. सरकारने गोकुळाष्टमीला परवानगी द्यावी.

- श्रीकांत परब, पणजी

बाजारपेठ सजली पण...

मंगळवारी (ता.३१) राज्यात गोकुळाष्टमी होणार आहे. त्यासाठी आवश्‍यक साहित्याने बाजारपेठ सजली आहे. लहान मुलांसाठी कृष्ण कन्हैयाचे पेहराव, गोविंदांसाठी डोकीला बांधायच्या पट्ट्या आणि विविध साहित्य बाजारात आले आहे. यंदा तुलनेने त्यांचे दरही घसरले आहेत. पण दहीहंडीबाबत संभ्रम असल्‍याने लोकांमध्ये उदासिनता दिसून येत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com