Goa Crime News: गोव्‍यात महिला असुरक्षित! दर तिसऱ्या दिवसाला एक बलात्‍कार किंवा अपहरण; साडेपाच वर्षांतील आकडेवारी आली समोर

साडेपाच वर्षांत बलात्‍काराची 394 प्रकरणे
 Kidnapping
Kidnapping Dainik Gomantak
Published on
Updated on

सुशांत कुंकळयेकर

एकाच दिवशी तीन खुनाच्‍या घटना नोंद झाल्‍याने संपूर्ण गोवा हादरून गेलेला असतानाच मागच्‍या तीन दिवसांत अल्‍पवयींनाचे विनयभंग होण्‍याच्‍या सहा घटना नोंद झाल्‍याने गोवा महिलांसाठी आणि विशेषत: अल्‍पवयीन मुलींसाठी सुरक्षित नसल्‍याचे उघड झाले आहे.

मागच्‍या साडेपाच वर्षांच्‍या आकडेवारीवर नजर घातल्‍यास गोव्‍यात प्रत्‍येक तिसऱ्या दिवशी एक बलात्‍काराचे किंवा अपहरणाचे प्रकरण नाेंद होत असल्‍याची माहिती पुढे आली आहे.

२०१८ ते आजपर्यंतची आकडेवारी पाहिल्‍यास या कालावधीत संपूर्ण गोव्‍यात ३९४ बलात्‍काराची प्रकरणे नोंद झाली असून अपहरणाची संख्‍या ३८५ एवढी प्रचंड आहे. चालू ऑगस्‍ट महिन्‍याची आकडेवारी पाहिल्‍यास ६ बलात्‍कार, १२ विनयभंग, एक अपहरण आणि एका महिलेचा खून अशी प्रकरणे घडली.

१२ विनयभंग प्रकरणांपैकी ५ प्रकरणे शाळेतील शिक्षकांनी केलेली असून एका शिक्षकावर एका अल्‍पवयीन मुलीवर बलात्‍कार केल्‍याचा आरोपही नोंद झाला आहे. २०२३मध्ये आतापर्यंत गोव्‍यात ५७ विनयभंगाची प्रकरणे नोंद झाली आहेत.

 Kidnapping
Margao Accident: राज्यात अपघातांचे सत्र सुरूच! वेळ्ळीत कारच्या धडकेत दोन युवती जखमी

गोव्‍यातील ही स्‍थिती भयानक या व्‍याख्‍येत मोडणारी, अशी प्रतिक्रिया महिला काँग्रेसच्‍या अध्‍यक्ष बीना नाईक यांनी व्‍यक्‍त केली.

जेव्‍हा राजकारणीच महिलांवरील लैंगिक अत्‍याचारात सामील झालेले असतात आणि इतर राजकारणी त्‍यांच्‍या करणीवर पांघरूण घालण्‍याचा प्रयत्‍न करतात त्‍यावेळी अशा प्रशासनाकडून महिलांना सुरक्षा मिळणार ही अपेक्षाच करणे व्‍यर्थ, असे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले.

 Kidnapping
Laterite Stone Theft: मयेतील खाणीमध्ये जांभा दगडाच्या चोरीप्रकरणी 4 जणांना अटक; डिचोली पोलिसांची कारवाई

राजकीय दबावामुळे दडपलेली प्रकरणे

काही वर्षांपूर्वी वास्‍को येथे एका शाळेत सात वर्षीय मुलीवर बलात्‍कार झाला होता. मात्र, त्‍यावेळी ते प्रकरण दडपले गेले. मागच्‍या वर्षी सिद्धी नाईक या मुलीचा खून झाला. हे प्रकरण सीबीआयकडे सुपुर्द करूनही त्‍यात कोण गुंतले आहेत हे अजूनही बाहेर आलेले नाही.

 Kidnapping
Bhoma Road Expansion: भोमवासीय ‘बायपास’वर ठाम, कोणत्याही स्थितीत रस्ता रुंदीकरणाला विरोधच

राजकारण्यांची मिळते साथ

गाेव्‍यात ज्‍यावेळी अशा घटना घडतात त्‍यावेळी कुणीतरी राजकारणी पुढे येऊन अशा गुन्‍हेगारांना पाठीशी घालण्‍याचा प्रयत्‍न करतो. राजकारण्‍यांच्‍या अशा वृत्तीमुळेच गुन्‍हेगार निर्ढावतात आणि त्‍यामुळेच गोव्‍यात महिलांवरील अत्‍याचार दिवसेंदिवस वाढत आहेत, अशी प्रतिक्रिया महिला आयोगाच्‍या माजी सदस्‍य नीना नाईक यांनी व्‍यक्‍त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com