Bhoma Road Expansion: भोमवासीय ‘बायपास’वर ठाम, कोणत्याही स्थितीत रस्ता रुंदीकरणाला विरोधच

सरकारवर विश्‍वास नाही : नेमके किती मीटर रुंदीकरण? याबाबत संभ्रम
Bhoma Road
Bhoma RoadDainik Gomantak
Published on
Updated on

अनिल पाटील

Bhoma Road राष्ट्रीय महामार्ग 4 अ पणजी-अनमोडच्या प्रस्तावित रुंदीकरणामधील भोम गावातील रुंदीकरण, भूमी अधिग्रहण रखडले आहे. गावकऱ्यांचा या रुंदीकरणाला तीव्र विरोध असून रुंदीकरण करण्याऐवजी बायपास रस्ता करावा, अशी मागणी करत कोणत्याही परिस्थितीत रुंदीकरण होऊ देणार नाही, यावर गावकरी ठाम आहेत.

राष्ट्रीय महामार्ग 66 मुंबई-गोवा-मंगळूरला बेळगावशी जोडल्या जाणाऱ्या काटकोनात्मक राष्ट्रीय महामार्ग 4 अ च्या प्रस्तावित रुंदीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम खात्याने हाती घेतले आहे. यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून वेगवेगळ्या निविदा जाहीर केल्या आहेत.

हा महामार्ग या गावातून जात असल्याने अनेक जुनी घरे, मंदिरे, देवालयांची तळी आदी या महामार्ग रुंदीकरणात येत असून ती पाडण्यात येणार आहेत. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याला वेगवेगळे पर्याय शोधले होते.

मात्र, आता सरकार रस्ता रुंदीकरणावर ठाम असून सरकारचे त्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. या रस्ता रुंदीकरणाला स्थानिकांचा तीव्र आक्षेप असून सरकारने रुंदीकरणाऐवजी अन्य पर्यायांचा विचार करावा. प्रामुख्याने रुंदीकरणाऐवजी बायपास करण्यात यावा, यावर ते ठाम आहेत.

Bhoma Road
Loksabha Election: भाजपने कंबर कसली, केंद्रीय सहसचिवांच्या गोव्यात बैठका

नेमके किती मीटर रुंदीकरण?

या रुंदीकरणासंबंधित माहिती देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंते भोम येथे आले असता त्यांनी २५ मीटर रस्ता रुंदीकरणाची माहिती दिली. त्यानंतर त्यांनीच ३० मीटर रुंदीकरण होईल, असे सांगितले.

माजी सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांनी 60 मीटर रस्ता होईल, असे सांगितले होते तर काही ठिकाणी ही माहिती 80 मीटर रस्त्याची आहे, त्यामुळे नेमके किती मीटरचे रुंदीकरण होईल, याबाबत संभ्रम आहे, असे स्थानिक म्हणतात.

बाणास्तरी पुलाचे काय ?

या रस्त्यावर सध्या बाणास्तरी येथे जुना पूल आहे. या ठिकाणाहूनच प्रस्तावित रस्ता रुंदीकरणाचा मार्ग जातो. त्यामुळे नवीन बाणस्तारी पूल कुठे येणार आणि त्याचे स्वरूप काय असेल, नवीन पूल कोठे जोडला जाईल, याबाबतही संभ्रम कायम आहे. याशिवाय बाणस्तारी-माशेल, साखळी, चोर्ला हा मार्ग कुठून जाईल, याबाबतही स्पष्टता नाही, अशी तक्रार स्थानिक करत आहेत.

Bhoma Road
Margao Accident: राज्यात अपघातांचे सत्र सुरूच! वेळ्ळीत कारच्या धडकेत दोन युवती जखमी

... यांची घरे जाणार !

सरकारच्या प्रस्तावित रस्ता रुंदीकरणामध्ये सुरेश गावडे भोमकर, संजय नाईक, किशोर नाईक, सीताराम गावडे, पांडुरंग नाईक आणि आमोणकर यांची घरे, दुकाने, हॉटेल येणार असल्याने ती पाडण्यात येणार आहेत.

तशा नोटिसा देण्यात आल्या आहेत. मात्र, त्या संबंधितांनी स्वीकारलेल्या नाहीत. यापैकी आमोणकर यांचे घर पडलेले असल्याने त्यांनी आपले घर सोडले असून ते पर्वरी येथे वास्तव्यास आहेत. यातील काही घरे पोर्तुगीजकालीन आहेत.

भाजप सत्तेबाहेर असताना या प्रस्तावित रस्ता रुंदीकरणाला त्यांनी विरोध केला होता. आता सत्तेत आल्यानंतर भाजप रुंदीकरणाच्या बाजूने आहे. याशिवाय स्थानिकांच्या मागण्या डावलण्यात येत आहेत. आमची मागणी रस्ता रुंदीकरण नसून बायपासच आहे.

- सुरेश गावडे, स्थानिक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com