माता न तूं वैरिणी! दीड महिन्‍याच्‍या बालिकेला प्‍लास्‍टिकात गुंडाळून उघड्यावर टाकले; कोल्हापूरच्या महिलेला अटक

Margao Crime: घृणास्पद कृत्यानंतर बोर्डा-मडगाव येथे उघड्यावर सापडले बालक
Margao Crime
Margao CrimeDainik Gomantak
Published on
Updated on

Margao Crime: एका दीड महिन्‍याच्‍या बालिकेला तिच्‍याच आईने उघड्यावर टाकून दिल्‍याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी फातोर्डा पोलिसांनी प्रियांका फर्नांडिस (30, चंदगड-महाराष्‍ट्र) हिला अटक केली आहे.

या महिलेने स्‍वत:च्‍याच मुलीला असे उघड्यावर का टाकून दिले याचे कारण मात्र स्‍पष्‍ट झालेले नाही.

फातोर्डा पोलिसांनी दिलेल्‍या माहितीप्रमाणे, या संशयित महिलेच्‍या विरोधात भादंसंच्‍या 317(स्‍वत:च्‍या मुलाला पोरके करणे), 336 (उघड्यावर फेकून देऊन जीव धोक्‍यात घालणे), तसेच बाल अत्‍याचार प्रतिबंध कायद्याच्‍या कलम 8 खाली गुन्‍हा नोंदविला आहे.

बोर्डा-मडगाव येथे आज सकाळी हा प्रकार उघडकीस आला. या भागातील एका महिलेला एक लहान बाळ रडत असल्‍याचा आवाज ऐकू आल्‍यानंतर तिने पहाणी केली असता, तिच्‍या घरामागच्‍या परसात एक लहान बाळ एका प्‍लास्‍टीक पिशवीत गुंडाळून टाकून दिल्‍याचे दिसून आले.

या बालकावर कुणी कुत्र्‍यांनी किंवा कावळ्यांनी हल्‍ला करु नये यासाठी त्‍या महिलेने त्‍या बाळाला आपल्‍या घरी आणले.

दरम्‍यान, याच महिलेच्‍या घराच्‍या शेजारी रहात असलेल्‍या संशयित प्रियांकाने आपले पती रिचर्ड फर्नांडिस याला जागे करुन घरातून बाळ नाहीसे झाल्‍याचा बनाव केला त्‍यामुळे रिचर्डने पोलिसांना फोन करुन घरी बोलावले.

Margao Crime
Yuri Alemao: मुख्यमंत्री सावंतानी गोव्याच्या मुद्द्यांवर चर्चा करावी - युरी आलेमाव

त्‍याचवेळी शेजारणीकडे ते बाळ असल्‍याचे दिसून आल्‍यावर पोलिसांनी त्‍याला आपल्‍या ताब्‍यात घेऊन ताबडतोब इस्‍पितळात दाखल केले.

घर आतून बंद असताना बाळ नाहीसे कसे झाले असा संशय आल्‍यामुळे पोलिसांनी घरच्‍यांचीच चौकशी सुरु केली असता प्रियांकाने शेवटी आपणच त्‍या बाळाला उघड्यावर टाकून दिले हे मान्‍य केले.

पोलिसांकडून मिळालेल्‍या माहितीप्रमाणे, मूळ चंदगड-महाराष्‍ट्र येथील हे कुटुंब बोर्डा येथे एका भाड्याच्‍या घरात रहात होते.

या प्रकरणात पोलीस निरीक्षक नाथन अाल्‍मेदा यांच्‍यासह महिला पोलीस उपनिरीक्षक प्रियांका नाईक, उपनिरीक्षक अमीन नाईक, अतिकेश खेडेकर आणि पिंक फोर्सच्‍या महिला पोलीस कर्मचार्‍यांनी तपास लावण्‍यास मदत केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Maharashtra Tribal Woman Crime
Margao Woman Cheated 33 lakhs
arrest warrant issued against mickky pacheco margao court
Cyber Crime
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com