Yuri Alemao: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना खुल्या चर्चेचे आव्हान दिल्यानंतर आपली प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी भाजप सरकार गोव्याच्या अस्मितेचे रक्षण करण्यास अपयशी ठरल्याचा आरोप मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतावर केला.
लोकशक्ती काँग्रेस आणि इंडिया आघाडीसोबत आहे. गोमंतकीयांना भाजपचा खरा चेहरा कळला आहे.
मी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना बेरोजगारी, भ्रष्टाचार, पर्यावरणाचा ऱ्हास, ढासळलेली कायदा व सुव्यवस्था आणि कोलमडलेली अर्थव्यवस्था यावर चर्चा करण्याचे आवाहन करतो, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यातील वाढत्या बेरोजगारीवर चर्चा करण्याचे धाडस करावे. भ्रष्टाचार शिगेला पोहोचला आहे.
कॅबिनेट मंत्री आणि भाजपचेच आमदार एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. हरित पट्ट्यांत मोठ्या प्रमाणावर जमीन रूपांतरण आणि मोठ्या प्रकल्पांमूळे पर्यावरणाचा विनाश होत आहे, असा दावा युरी आलेमाव यांनी केला आहे.
राज्यात कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून, हत्या वाढत आहेत. कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्यांना थांगपत्ता न लागू देता मृतदेह गोव्यातून बाहेर नेले जातात.
सिद्धी नाईकच्या गूढ मृत्यूच्या तपासाचे काय झाले, याचा खुलासा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी करावा अशी मागणी युरी आलेमाव यांनी केली आहे.
भाजप सरकारच्या इव्हेंट आयोजनाच्या ध्यासाने राज्यात अर्थव्यवस्था कोलमडली आहे. राज्याचे कर्ज जवळपास 36000 कोटींवर पोहोचले आहे. भाजप सरकारने गोव्याला दिवाळखोरीत ढकलले आहे, असा आरोप युरी आलेमाव यांनी केला आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांना म्हादईच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट घडवून आणण्यास अपयश आले.
कळसा भंडूरा प्रकल्पाचा डीपीआर मागे घेण्यात भाजप सरकार का अपयशी ठरले? असा प्रश्न युरी आलेमाव यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे.
काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना २४ मुद्द्यांवर रिपोर्ट कार्ड सादर करण्याचे आव्हान दिले होते. मुख्यमंत्र्यांनी आजपर्यंत त्यावर शब्द काढला नाही ही शरमेची बाब आहे, असा टोला युरी आलेमाव यांनी हाणला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.