Corchorem Health Center काकोडा-कुडचडे आरोग्य केंद्रावर सांगे, सावर्डे, केपे, कुडचडे व जवळच्या धारबांदोडा भागातील नागरिक अवलंबून आहेत. असे असूनही नवीन आरोग्य केंद्र पूर्ण सुविधायुक्त करण्यासाठी सरकार केवळ चालढकल करीत आहे.
येत्या महिन्याभरात हॉस्पिटलच्या कारभारात सुधारणा न झाल्यास लोकांना घेऊन काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा गुरुवारी (ता.३१) प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी दिला.
कुडचडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकारी डॉ. मेघा कुडचडकर यांना घेराव घातल्यानंतर पाटकर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी पन्नासपेक्षा अधिक काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
कुडचडे गट काँग्रेसने काकोडा-कुडचडे प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिस्थितीचा पाठपुरावा घेण्यासाठी आरोग्यधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
यावेळी आरोग्यधिकारी डॉ. मेघा कुडचडकर यांनी आपण काँग्रेस पक्षाने दिलेले निवेदन आरोग्य संचालकांना सादर करून पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.
काकोडा-कुडचडे आरोग्य केंद्रातील समस्या
अपुरा कर्मचारी वर्ग असल्यामुळे इतरांना त्याचा फटका बसतो.
डॉक्टर, प्रसूतीतज्ज्ञ, एक्सरे ऑपरेटर, कारकून, मल्टिटास्किंग कर्मचाऱ्यासहित एकूण तेवीस जागा रिक्त आहेत.
रुग्णांना सकस आहार का दिला जात नाही, असे पराग सबनीस यांनी विचारले असता अपुरा निधीपुरवठा असल्याचे स्पष्ट झाले.
एकच रुग्णवाहिका असल्यामुळे रुग्णांसाठी खासगी रुग्णवाहिकेचा वापर करावा लागतो.
आरोग्य केंद्रात बसण्यासाठी जागा नाही, पंखे नाहीत व पार्किंग जागेत अंधार आहे.
रुग्णांसोबत असणाऱ्यांना कँटिनची सोय नाही, पाणी नाही.
दीडशे रुग्णांसाठी फक्त दोन शौचालये असल्याने रुग्णांची गैरसोय.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.