Goa Politics: "सासष्टीत कोणालाही गृहीत धरु नका!" भाजपला रोखण्यासाठी काँग्रेसचा 'मास्टर प्लॅन' तयार; नवनियुक्त कार्याध्यक्षांनी दिले मोठे संकेत

goa congress working president sunil kawthankar: सासष्टीत आम्ही कोणालाही गृहीत धरू शकत नाही. घटकपक्षांना बरोबर घेऊनच पुढे गेलो तरच भाजपचा वारू रोखला जाईल, असा विश्वास काँग्रेसचे नवनियुक्त कार्याध्यक्ष सुनील कवठणकर यांनी व्यक्त केला.
Goa Politics
goa congress working president sunil kawthankarDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: काँग्रेसमध्ये काहीही गोंधळ झाला की त्याचा फायदा थेट भाजपला होतो. पक्षात थोडीशी अंतर्गत धुसफूस झाली की त्यात तेल ओतण्याचे काम भाजप करणारच. त्याचबरोबर सासष्टीत आम्ही कोणालाही गृहीत धरू शकत नाही. घटकपक्षांना बरोबर घेऊनच पुढे गेलो तरच भाजपचा वारू रोखला जाईल, असा विश्वास काँग्रेसचे नवनियुक्त कार्याध्यक्ष सुनील कवठणकर यांनी व्यक्त केला.

‘गोमन्तक टीव्ही’चे संपादक-संचालक राजू नायक यांनी सुनील कवठणकर यांची मंगळवारी मुलाखत घेतली. त्यात कवठणकर यांनी प्रदेशाध्यक्ष बदल, अंतर्गत नाराजीप्रकरण आणि पक्षाची वाटचाल याविषयी आपले मत व्यक्त केले.

Goa Politics
Goa Politics: शिंदेसेना गोव्यात तग धरू शकेल?

कवठणकर म्हणाले, काँग्रेस पक्षापुढे आज बाहेरील आणि अंतर्गत आव्हाने आहेत. यापूर्वीही अशा स्थितीतून पक्ष गेलेला आहे. काँग्रेस हा व्यावसायिक पक्ष नाही, तर तो एक विचार आहे. या विचारधारेचे लोक जर गंभीरपणे काम करतील, जनतेच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी त्याग करून पक्षाचा विचार पुढे नेण्याचे काम करतील, तर ते आवश्यक आहे. साम, दाम, दंड आणि भेद यांचा वापर करणाऱ्या भाजपसारखा भस्मासुर पुढे उभा असताना लोक काँग्रेसबरोबर जोडले जात आहेत, ही नक्कीच आशादायी गोष्ट मानावी लागेल. मोठ्या प्रमाणात लोक काँग्रेसकडे येत आहेत. लोक भाजपकडे का जात नाहीत? कारण त्या लोकांना काँग्रेस पक्ष हवा आहे.

Goa Politics
Goa Politics: गोव्यात नव्या प्रादेशिक पक्षाची चर्चा; राजकीय गती की विरोधकांची अधोगती?

कवठणकर म्हणाले...

काँग्रेसमधून (Congress) फुटून गेलेले कित्येक आमदार पुन्हा पक्षात येण्याचे प्रयत्न करतात.

प्रमुख विरोधी पक्ष म्हणून सर्व घटकपक्षांना बरोबर घेऊन जाण्याची जबाबदारी काँग्रेसची आहे.

पक्षात कोणालाही घेण्याचा निर्णय हा कोणी एका नेत्याचा नसतो. त्यासाठी हायकमांडशी चर्चा करावी लागते.

सासष्टीतील विरोधी पक्षनेता व दक्षिण गोव्याचे खासदार हेही सासष्टीतीलच आहेत. त्यामुळे अल्पसंख्यांकांना बाजूला केले, असे म्हणणे चुकीचे आहे.

Goa Politics
Goa politics: 'ते' प्रवर्तक राजकारणात नवखेच! गोवा काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष फ्रान्सिस गोविया वेळसावचे

चुका आणि शिक्षा

१. पक्षानेही चुका केल्या आहेत; पण पक्षात ज्यांनी चुका केल्या आहेत, त्यांना लोकांनी घरी पाठवले आहे. काँग्रेसने चुका केल्या म्हणून भाजपला लोकांनी आणले; पण लोकांना आता समजून चुकले आहे की, भाजपला आणणे हीच मोठी चूक ठरली आहे.

२. लोकांना सध्या तरी केवळ काँग्रेस हीच आशा दिसते. भ्रष्टाचारातून मिळवलेल्या मोठ्या प्रमाणातील पैशाच्या आणि केंद्र सरकारकडून होत असलेल्या सरकारी यंत्रणांच्या गैरवापराच्या जोरावर काम करणाऱ्या भाजपला तोंड देण्याची जबाबदारी यापूर्वी निवडलेल्या तीन कार्याध्यक्षांना वाटून दिलेली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com