Goa politic: 'ते' प्रवर्तक राजकारणात नवखेच! गोवा काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष फ्रान्सिस गोविया वेळसावचे

Goa Congress Party: गोव्यात ‘गोवा काँग्रेस पार्टी’ नावाचा नवा राजकीय पक्ष काढण्यासाठी नोटीस जारी केल्याची जाहिरात प्रसिद्ध झाल्यावर तो राज्यात चर्चेचा विषय बनला असून या पक्षाचे प्रवर्तक कोण?
Goa Congress Party
Goa politicDainik Goamantak
Published on
Updated on

मडगाव: गोव्यात ‘गोवा काँग्रेस पार्टी’ नावाचा नवा राजकीय पक्ष काढण्यासाठी नोटीस जारी केल्याची जाहिरात प्रसिद्ध झाल्यावर तो राज्यात चर्चेचा विषय बनला असून या पक्षाचे प्रवर्तक कोण? हे जाणून घेण्याबद्दल लोकांमध्ये एकप्रकारची उत्सुकता निर्माण झाली आहे. हे प्रवर्तक राजकारणात सक्रिय असलेले की त्यांना उगीच कुणीतरी पुढे काढले असून दुसराच कुणीतरी मागून सूत्रे हलवित तर नाही ना, अशी शंकाही लोक उपस्थित करू लागले आहेत.

या पक्षाचे अध्यक्ष म्हणून वेळसाव-कासावली येथील फ्रान्सिस आंतोनियो गोविया यांचे नाव असून या पक्षाचा पत्ता म्हणून डायना गोविया यांच्या घराचा पत्ता देण्यात आला आहे. यासंदर्भात चौकशी केली असता डायना गोविया या वेळसाव पंचायतीच्या विद्यमान सरपंच असून फ्रान्सिस गोविया यांच्या त्या पत्नी होत.

Goa Congress Party
Goa Congress: प्रतिमा कुतिन्हो यांची काँग्रेसमध्ये घरवापसी; नेत्यांकडून स्वागत, पक्ष सदस्यत्वाचा अर्ज गटसमिती अध्यक्षांकडे सादर

फ्रान्सिस गोविया यांची पत्नी जरी सरपंच असली तरी ते स्वतः राजकारणात फारसे सक्रिय नाहीत. या पक्षाचे खजिनदार ब्रुनो परेरा हेही वेळसाव येथील असून तेही राजकारणात नवखेच असल्याचे सांगितले जाते.

ओरविल दोरादो यांना जवळ!

असे जरी असले तरी गोविया हे काँग्रेस प्रदेश समितीचे माजी खजिनदार ओरविल दोरादो यांना जवळ असून दोरादो यांच्याच पाठिंब्याने त्यांची पत्नी डायना या सरपंचपदी निवडून आल्याचे सांगितले जाते. दोरादो हे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांना जवळचे मानले जात असून पाटकर यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून काढून टाकताना दोरादो यांनाही खजिनदार पदावरून हटविले होते. त्यांच्या जागेवर अनुक्रमे गिरीश चोडणकर आणि दत्ता दामोदर नायक यांची नियुक्ती करण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com