Bardez: प्रशासकीय कार्यालयात पाणी नाही मग सामान्य जनतेचं काय? पाणीप्रश्नावरून काँग्रेसचा 'साबांखा' कार्यालयावर घागर मोर्चा

Goa Water Crisis: एकंदर हलगर्जीपणा व अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळेच लोकांना आठवडाभर पाण्यासाठी दारोदारी फिरावे लागल्याने काँग्रेसने सरकारच्या कारभारावर तीव्र शब्दांत टीका केली.
Goa Congress protest about water supply
Goa CongressDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Congress protest Mapusa PWD Office

म्हापसा: गेल्या आठवड्याभरापासून बार्देश तालुक्यात पाण्याची समस्या जटील बनली आहे. म्हापसा व पर्वरी या मतदारसंघातील लोकांचे पाण्यासाठी प्रचंड हाल झाले. त्याशिवाय साळगाव, हणजूण भागात पाण्यासाठी लोकांना वणवण करावी लागली. या पार्श्वभूमीवर गुरुवारी (ता. ३०) काँग्रेसने म्हापसा येथील साबांखा पाणीपुरवठा कार्यालयावर घागर मोर्चा काढला.

सरकारी यंत्रणेचा निषेध म्हणून यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या हातात धरल्या होत्या. कार्यालयात अभियंते नसल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी निवेदन शेवटी इनवर्ड केले. कार्यालयात अधिकारी नसल्याने मोर्चेकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, तालुक्यातील बहुतांश भागात बुधवारी रात्री उशिरा तसेच गुरुवारी सकाळी पाणीपुरवठा झाला.

एकंदर सरकारचा हलगर्जीपणा व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळेच लोकांना आठवडाभर पाण्यासाठी दारोदारी फिरावे लागल्याने काँग्रेसने सरकारच्या कारभारावर तीव्र शब्दांत टीका केली. काँग्रेसचे सरचिटणीस विजय भिके यांच्या नेतृत्वाखाली विरेंद्र शिरोडकर, चंदन मांद्रेकर, प्रतिक्षा खलप, पार्वती नागवेकर, बलभीम मालवणकर व इतरांनी या मोर्चात सहभाग घेतला.

Goa Congress protest about water supply
Bardez Water Supply: तिळारीच्या कालव्याला भगदाड! बार्देशकरांनो पाणी जपून वापरा; काही दिवस मर्यादित पाणी पुरवठा

पार्वती नागवेकर म्हणाल्या, की आम्ही पाणी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी साबांखा कार्यालयातील स्वच्छतागृहात पाणी नव्हते. प्रशासकीय कार्यालयात पाणी नाही, मग सरकार सामान्य जनतेला कुठून पाणीपुरवठा करणार? असे म्हणत त्यांनी सरकारच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ज्या अभियंत्याच्या हलगर्जीपणामुळे आमठाणे धरणाचे गेट वेळेत उघडता आले नाही व पाणीपुरवठा रखडला, त्या अधिकाऱ्याचे सरकारने फोटोसह नाव जाहीर करावे.

Goa Congress protest about water supply
Bardez Water Crisis: अस्नोड्यात पाणी तरी बार्देश अजून तहानलेलाच! टँकरमाफियाकडून लूट; पर्वरीलाही फटका

‘मूलभूत गरजा पुरवण्यात सरकार अपयशी’

विजय भिके म्हणाले की, सरकार केवळ उद्‍घाटन व इव्हेंटचे व्यवस्थापन करण्यात गुंग आहे. लोकांची मुलभूत गरज असलेले पाणी सरकारला पुरवता येत नाही, यापेक्षा दुसरे दुर्दैव नाही. लोकांनी पाणी विकत आणून आपली तहान भागवली. एकीकडे प्रशासन ‘सरकार तुमच्या दारी’ अशा वल्गना करते. मात्र, या केवळ घोषणा आहेत. प्रशासकीय यंत्रणा कोमलडल्यानेच बार्देशवासीयांवर अक्षरशः पाणीबाणी लादली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com