Bardez Water Supply: तिळारीच्या कालव्याला भगदाड! बार्देशकरांनो पाणी जपून वापरा; काही दिवस मर्यादित पाणी पुरवठा

Tilari Canal Leakage: शुक्रवारी कुडासे - महाराष्ट्र येथे तिळारी कालव्याला मोठं भगदाड पडलं आहे. त्यामुळं आजपासून हा पुरवठा सुरळीत होईपर्यंत बार्देश तालुक्यात मर्यादित पाणी पुरवठा होणार आहे.
Limited Water Supply
Limited Water SupplyDainik Gomantak
Published on
Updated on

दोडामार्ग : कुडासे - महाराष्ट्र येथे तिळारी कालव्याला भगदाड पडल्यामुळं पाण्याचा पुरवठा बंद झाला असून आजपासून (२४ जानेवारी) हा पुरवठा सुरळीत होईपर्यंत बार्देश तालुक्यात मर्यादित पाणी पुरवठा होणार आहे.

साटेली भेडशी भोमवाडी येथे येथे तिळारी कालव्याचं गेल्याच वर्षी काम करण्यात आलं होतं. आता त्याच ठिकाणी शुक्रवारी सकाळच्या दरम्यान मोठं भगदाड पडलं आहे. भगदाड पडलेल्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह जात असून साटेली भेडशी भोमवाडी कुडासे रस्त्याला नदीचं स्वरूप आल्याच पाहायला मिळालं.

कालव्याचं पाणी लगतच्या शेतीत गेल्यामुळं बागायतीचं मोठं नुकसान झालं आहे. सहा महिन्यापूर्वीच या कालव्याचं काम करण्यात आलं होतं. त्याच ठिकाणी पुन्हा एकदा मोठे भगदाड पडलं आहे. भगदाड पडल्यामुळं रस्त्यावर पाणीच पाणी झालं होतं.

Limited Water Supply
Goa Politics: गोवा काँग्रेस सरकारला घेरण्यात अपयशी; दोन वर्षांत एकही अहवाल नाही, नामी संधी घालवल्याने विरोधक नापास

मुख्यमंत्र्यांकडून काळव्याची पाहणी

तिळारी काळव्याची मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्याकडून पाहणी करण्यात आलीय. त्यांच्यासोबत मंत्री सुभाष शिरोडकर आणि आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये उपस्थित होते. काळव्यामार्फत होणारा पाणी पुरवठा थांबवण्यात आला असून कार्यकारी अभियंत्यांसह कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले आहेत.

तिलारी काळवा महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांसाठी महत्त्वाचा जलस्रोत आहे. तिलारी धरण प्रकल्प हा महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात असून, हे धरण गोवा आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांना पाणीपुरवठा करतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com