Goa Congress: सावियो कुतिन्होंचा कॉंग्रेसमध्ये पुर्नप्रवेश; पक्षातील दिलजमाईमुळे उमेदवारी शक्य

‘मिशन मडगाव’ यशस्वीतेचा निर्धार
Goa Congress
Goa CongressDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Congress शॅडो कौन्सिलचे निमंत्रक व माजी नगराध्यक्ष सावियो कुतिन्हो यांनी आज कॉंग्रेस पक्षात पुर्नप्रवेश केला. खासदार फ्रान्सिस सार्दिन, प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव व दक्षिण गोवा जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सावियो डिसिल्वा यांनी सावियो यांच्याबद्दल जे उद्‍गार काढले व जो उत्साह कॉंग्रेस पक्षात दिसला ते पाहता सावियो कुतिन्होच 2027 च्या विधानसभा निवडणुकीत मडगावचे उमेदवार असतील असे संकेत मिळाले आहेत.

सावियो डिसिल्वा यांनी सांगितले की, मडगावमध्ये कामत विरोधात केवळ सावियो डिसिल्वाच टक्कर देऊ शकतात. या पक्ष प्रवेश सोहळ्यात सर्वच वक्त्यांनी राज्य तसेच केंद्र सरकारच्या कारभारावर टीका केली.

आपला कॉंग्रेस प्रवेश म्हणजे मिशन मडगाव, असे सावियो कुतिन्हो यांनी सांगितले. हे मिशन मडगावकरांच्या सहकार्याने यशस्वी केले जाईल, असेही कुतिन्हो म्हणाले. मडगावमध्ये कॉंग्रेसला बळकटी आणली जाईल.

त्याचप्रमाणे मडगावमधील मोहीम आक्रमकतेने पूर्ण केली जाईल व लोकांना शिक्षित केले जाईल. मडगावात कॉंग्रेस पक्षात नवी झळाळी आणली जाईल, असेही ते म्हणाले.

या कार्यक्रमाला हळदोणेचे आमदार कार्लोस आल्मेदा फेरेरा तसेच केपेचे आमदार एल्टन डिकॉस्ता, महिला कॉंग्रेस अध्यक्ष बीना नाईक, प्रदेश उपाध्यक्ष एम. के. शेख उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांचे नियंत्रण सुटले

गोव्याच्या मंत्रिमंडळात एकजूट नाही. प्रत्येक मंत्री आपल्याला हवा तसा वागतो, हवे ते निर्णय घेतो. गोव्याला घटकराज्य मिळाल्यानंतरचे हे सर्वांत वाईट मंत्रिमंडळ असल्याची टीका विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली.

भारतीय जनता पक्ष समाजामध्ये केवळ धार्मिक तेढ निर्माण करीत आहे. पुढील काही दिवसांत कॉंग्रेस पक्षाची रचना व्यवस्थीत केली जाईल. तसेच वार्ड समित्या स्थापन केल्या जातील, असेही आलेमाव यांनी सांगितले.

कामतांवर टीका

सावियो कुतिन्हो यांनी आज मडगावचे आमदार दिगंबर कामत यांच्यावर टीका करताना सांगितले, की त्यांनी मडगावकरांचा विश्र्वासघात केला. विकासकामांच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केली जात आहे. मडगावात एकही योजना पूर्णत्वास गेलेली नाही. साळ नदीचे प्रदूषण हे चांगले उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले.

देशहित जपूनच निर्णय’

भारतीय जनता पक्ष केवळ कॉंग्रेसने घेतलेल्या मागील निर्णयांवर टीका करीत आहे. मात्र, कॉंग्रेसने परिस्थितीनुरूप व देशाचे हित जपूनच निर्णय घेतलेले आहेत, असे खासदार फ्रान्सिस सार्दिन यानी सांगितले. आम्ही देशामध्ये केवळ बंधुभाव पसरला, द्वेष नाही, असेही ते म्हणाले.

Goa Congress
37th National Games: अतिथी देवो भवः; पाहुण्‍या क्रीडापटूंचे गोव्‍यात स्वागत, स्पर्धेचे काऊंटडाऊन सुरू

‘लोकसभेच्या दोन्ही जागा काँग्रेसच जिंकणार’

प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली व सध्याचे सरकार केवळ श्रीमंतांचे असल्याचे सांगितले. पुढील एक दोन महिन्यांत कमीत कमीत १५ मतदारसंघातील नेते कॉंग्रेसमध्ये प्रवेश करतील.

सावियो कुतिन्हो यांचा प्रवेश हा गोव्याच्या दृष्टिने नवी पहाट व गोव्याच्या पुढील राजकीय वाटचालीची कल्पना देणारी आहे. रोजगार, महागाई या मुद्यांवर सरकार अपयशी ठरलेले आहे. आता लोकांना हळूहळू कॉंग्रेसचे महत्त्व पटू लागले आहे व २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत गोव्याच्या दोन्ही जागा कॉंग्रेस पक्षच जिंकेल, असा विश्र्वास त्यांनी व्यक्त केला.

Goa Congress
Goa Eco Sensitive Zone: स्‍वार्थासाठी लोकांना घाबरवणे सुरू; हरित संवेदनशील क्षेत्र हिताचेच!

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com