Francisco Sardinha: विरियातो यांना शुभेच्छा! 'आता मी फक्‍त आराम करणार'- फ्रान्‍सिस सार्दिन

Francisco Sardinha: दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने तिकीट नाकारलेले विद्यमान खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी आपली नाराजी स्‍पष्‍ट केली.
MP Francisco Sardinha
MP Francisco SardinhaDainik Gomantak
Published on
Updated on

Francisco Sardinha

दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने तिकीट नाकारलेले विद्यमान खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी आपली नाराजी स्‍पष्‍ट करताना, या निवडणुकीच्‍या प्रचारात आपण भाग घेणार नसल्‍याचे स्‍पष्‍ट केले. ‘आता मी फक्‍त आराम करणार’, असे त्‍यांनी पत्रकारांना सांगितले. सध्या निवडणूक लढवण्याची आपली कसलीच इच्छा नसल्याचेही त्‍यांनी यावेळी स्‍पष्‍ट केले.

सार्दिन म्हणाले की, दहावेळा मी निवडून आलो. चारवेळा खासदार झालो. मुख्यमंत्रीही झालो. विद्यमान खासदार म्हणून तिकिटाची मला अपेक्षा होती, परंतु पक्षाने माझा पत्ता कापल्याने मी दुःखी नव्हे, पण निराश झालेलो आहे. यावेळी मी जिंकण्‍याची सर्वांत अधिक चांगली संधी होती. लाेकांकडून मला तसा प्रतिसादही मिळत होता.

काँग्रेसने दक्षिण गोव्‍यातील तिकीट नाकारल्याचे कळताच मी माझ्या कार्यकर्त्यांना राजकारणापासून तूर्त दूर होत असल्याचे सांगितले. पण माझे समाजकार्य चालूच ठेवणार आहे. अनेकांनी मला तुम्ही ही निवडणूक लढवाच, असा आग्रह धरला. परंतु मला निवडणूक लढवायची नाही. मी आराम करणार, असे सार्दिन म्हणाले.

पक्षात नव्यानेच आलेल्या काहीजणांना मी नको होतो. खरे तर काँग्रेस पक्ष जुन्या नेत्यांनीच जिवंत ठेवला. १९७७ पर्यंत गोव्यात काँग्रेस तशी अस्तित्वात नव्हती. परंतु मी, प्रतापसिंह राणे, बाबू नायक, डॉ. विली डिसोझा, एदुआर्द फालेरो अशा आम्ही सर्वांनी काँग्रेसला चांगले दिवस आणले.

२०१४ साली काँग्रेसने रेजिनाल्ड यांना तिकीट दिले तेव्हा त्यांचा ३२ हजार मतांनी पराभव झाला. विजय सरदेसाई यांनी फातोर्ड्यात रेजिनाल्डसाठी काम करूनही तेथे ९,६०० मते मिळाली. २०१९ च्या निवडणुकीत सरदेसाई यांनी माझ्यासाठी काहीच काम केले नसताना फातोर्ड्यात मला १०,९६० मते मिळाली अशी आठवणही त्यांनी करून दिली.

MP Francisco Sardinha
Calangute: भाजपला कळंगुटमधून आघाडी देण्याचे लोबोंपुढे आव्हान! प्रचारात ‘आरजी’पुढे

‘मी आज कालचा नेता नव्हे’

या निवडणुकीत तुम्‍ही काँग्रेस उमेदवारासाठी काम करणार का असे विचारले असता, मी आज कालचा नेता नव्हे, लोक मला चांगले ओळखतात. या राज्याचा मी मुख्यमंत्री होतो.

मी अजूनही लोकांशी कनेक्टेड आहे. लोक आग्रह करतात की, पक्षाने तिकीट नाकारली तरी मी रिंगणात उतरावे, परंतु सध्या तरी माझी तशी इच्छा नाही. भविष्यात काय ते पाहू. दुखावलेले सार्दिन या निवडणुकीत सक्रिय राहणार नाहीत.

तसेच पक्षाचे उमेदवार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांच्यासाठी काम करणार नाहीत, हे त्‍यामुळे स्पष्ट झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com