

पणजी: जिल्हा पंचायत निवडणुकीत दहा जागा काँग्रेसने मिळविल्या असून, काही ठिकाणी कमी मतांनी पक्षाच्या उमेदवारांचा पराभव झाला आहे. काँग्रेस हा जिल्हा पंचायतीत सर्वात मोठा विरोधी पक्ष ठरला आहे. जनतेने भाजपविरोधात दिलेली मतांची आकडेवारी पाहिल्यास २०२७ मध्ये काँग्रेस-फॉरवर्ड युतीला २७ जागा मिळतील, असा अंदाज प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी व्यक्त केला.
काँग्रेस भवनात झालेल्या पत्रकार परिषदेस पाटकर यांच्याबरोबर खासदार विरियातो फर्नांडिस, उत्तर गोवा जिल्हाधिकारी वीरेंद्र शिरोडकर, खजिनदार व दक्षिण गोव्यात निवडून आलेल्या जिल्हा पंचायत सदस्य अँथोनी ब्रागांझा, लुईझा रॉड्रिग्स यांची उपस्थित होते.
पाटकर म्हणाले, जिल्हा पंचायतीत उत्तर गोव्यात शिरसई व हळदोणा या दोन जागा जिंकल्या, तसेच सात जागांवर कमी मतांनी काँग्रेसचे उमेदवार पडले आहेत. तेथील बुथनिहाय यावर चर्चा करणार आहोत.
दक्षिण गोव्याचा विचार केला तर आठ ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार कमी मतांनी पराभव झाला आहे, तर पाच ठिकाणी आमचे उमेदवार दुसऱ्या स्थानी राहिला आहे. काँग्रेसचे दहा-फॉरवर्डचा १ व अपक्ष उमेदवार असे १२ उमेदवार निवडून आले आहेत.
ते पुढे म्हणाले, या काँग्रेसने ३६ व फॉरवर्डचे ९ जागा अशा ४५ ठिकाणी युती लढली. १२ जागांवर उसगाव-गांजे जागा सोडून इतर ठिकाणी बहुजन-अल्पसंख्यांक उमेदवार उभे केले होते. पक्षाचे बुथनिहाय विश्लेषण सुरू आहे,असेही ते म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.