Goa ZP Election: भाजपची मते वाढली,जागा घटल्या; काँग्रेसच्या जागांमध्ये वाढ; काय झाले नेमके? वाचा निवडणुकीचे Report Card

Goa ZP Election Result Analysis: . मागील तुलनेत भाजपच्या मतांच्या टक्केवारीत ६.८१ टक्क्यांची वाढ झाली असली, तरी जागांच्या संख्येत घट नोंदवली गेली आहे. दुसरीकडे, काँग्रेसच्या मतांच्या टक्केवारीत ६.९७ टक्क्यांची घट.
BJP, Congress
BJP, CongressDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: जिल्हा पंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने २,५०,१४९ मते मिळवत ४०.१२ टक्के मतांसह आघाडी घेतली. मागील तुलनेत भाजपच्या मतांच्या टक्केवारीत ६.८१ टक्क्यांची वाढ झाली असली, तरी जागांच्या संख्येत घट नोंदवली गेली आहे. दुसरीकडे, काँग्रेसच्या मतांच्या टक्केवारीत ६.९७ टक्क्यांची घट झाली असली तरीही काँग्रेसच्या जागांमध्ये वाढ होत, त्या ४ वरून १० झाल्या आहेत.

तुलनात्मक आकडेवारीनुसार, २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला ३३.३१ टक्के मते मिळाली होती; तर यंदाच्या जिल्हा पंचायत निवडणुकीत हा टक्का ४०.१२ वर पोहोचला. काँग्रेसला २०२२ मध्ये २३.४६ टक्के मते मिळाली होती; मात्र यंदा हा टक्का १६.४९ इतका राहिला आहे.

जिल्हा पंचायत निवडणुकीत अपक्षांनी १७.०७ टक्के मते मिळवली. त्‍यांना विधानसभा निवडणुकीत ९.३५ टक्के मते मिळाली होती. ‘आरजी’ने या निवडणुकीत ९.२३ टक्के मते मिळवली. त्यांची २०२२ मधील टक्केवारी ९.८१ टक्के होती. ‘आप’ ला ५.९७ टक्के मते मिळाली यापूर्वी त्यांची मतांची टक्केवारी ६.७७ टक्के होती.

BJP, Congress
Goa ZP Election Result: भाजपने गतवेळच्या 7 जागा गमावल्या, काँग्रेसने नवे 6 मतदारसंघ जिंकले; भाजपच्‍या काही मंत्र्यांना झटका

गोवा फॉरवर्डला आता ४.९० टक्के मते मिळाली. त्यांना २०२२ मध्ये १.८४ टक्के मते होती. ‘मगो’ची आताची मते ३.७९ टक्के आहेत, त्यांची पूर्वीची मते ७.६० टक्के होती. राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार गट) यांना आता ०.२२ टक्के मते मिळाली आहेत.

BJP, Congress
Goa ZP Election: जिल्हा पंचायत निवडणुकीची सांगता होताच 'आदर्श आचारसंहिता' शिथिल; विकासकामांचा मार्ग मोकळा

मतविभाजन आणि बहुकोनी लढती

कोलवा येथे विजेत्याला केवळ ३०.८४% मते मिळाली, तर तोरसे येथे हा आकडा ३२.५४ टक्के होता. हे आकडे मतांचे तीव्र विभाजन आणि अनेक पक्ष-अपक्ष उमेदवारांमधील स्पर्धा स्पष्ट करतात.

मतदारसंघातील मतदानाचे प्रमाण सर्वाधिक वैध मते बोरी (दक्षिण गोवा) येथे २०,२२३, तर सर्वात कमी नावेली (दक्षिण गोवा) येथे ८,६०८ नोंदवली गेली. उत्तर गोव्यात भाजपने १८ जागा, दक्षिण गोव्यात ११ जागा जिंकल्या. एकूण राज्यात भाजप २९ जागांसह आघाडीवर आहे. कॉंग्रेसला १०, अपक्षांना ४, मगोला ३, आरजी २, गोवा फॉरवर्ड आणि आप प्रत्येकी १ जागा मिळाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Congress Press Conference
Goa NCRB Crime Report
Goa Politics
dr anjali nimbalkar slams bjp
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com