Goa Congress : ज्वलंत मुद्दे मांडण्यात गैर काय? काँग्रेस पक्षातर्फे राजधानी पणजीत निदर्शने

जनतेने संघटित होऊन या असंवेदनशील सरकारला धडा शिकवला पाहिजे, असे आवाहन पाटकर यांनी केले.
Goa Congress
Goa CongressDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Congress: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नेहमीच महागाई, बेरोजगारी आणि देशात निर्माण झालेल्या जातीय तणावासारखे मुद्दे उपस्थित केले. त्यांच्याविरुद्ध गुजरात न्यायालयाने दिलेला निकाल दुर्दैवी आहे, ही लोकशाहीची हत्या आहे. देशातील जनता राहुल गांधींसोबत आहे. ज्वलंत मुद्दे मांडणे चुकीचे आहे का? असा प्रश्न काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी उपस्थित केला. राहुल गांधी यांच्या ‘मोदी’ आडनावाच्या वक्तव्यावरील खटल्यातील शिक्षेला स्थगिती देण्यास गुजरात उच्च न्यायालयाने नाकारल्याने, काँग्रेस नेत्यांनी निदर्शने केली.

यावेळी बीना नाईक, विजय भिके, जनार्दन भंडारी, प्रदीप नाईक, ऑरवील दोरादो, अर्चित नाईक, एवर्सन वालीस, वीरेंद्र शिरोडकर, सावियो डिसूझा, जयदेव प्रभुगांवकर, विवेक डिसिल्वा, साईश‌आरोसकर, पलेजिया रापोझ आदी उपस्थित होते.

पाटकर म्हणाले, आमचे नेते राहुल गांधी यांच्याविरोधात सत्ताधारी पक्ष सरकारी यंत्रणेचा गैरवापर करत आहे. राहुल गांधी यांच्याविरोधात कट रचणे म्हणजे ‘लोकशाहीची हत्या’ आहे. नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी यांच्यातील संबंधांबद्दल त्यांनी संसद भवनात आवाज उठविला म्हणून या भ्रष्ट जुमला पक्षाने षड्यंत्र रचून त्यांना खासदार म्हणून अपात्र ठरवले. संसदेत सर्वसामान्यांचे प्रश्न मांडले होते. आजचा हा निकाल दुर्दैवी आहे. मोदी सरकार सर्वच बाबींवर अपयशी ठरले आहे.

Goa Congress
Goa Monsoon 2023: राज्यात 8 जुलै ते 10 जुलै पावसाचा यलो अलर्ट; गोवा वेधशाळेची माहिती

पंतप्रधानांनी दिलेल्या नोकऱ्यांच्या आश्वासनाचे काय झाले? एलपीजीच्या किमती कमी का झाल्या नाहीत? महागाई नियंत्रणात आणण्यात आणि जनतेला दिलासा देण्यात मोदी सरकार अपयशी का ठरले? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. जनतेने संघटित होऊन या असंवेदनशील सरकारला धडा शिकवला पाहिजे, असे आवाहन पाटकर यांनी केले.

भिके म्हणाले, देशात कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे. मणिपूर त्रस्त आहे, मात्र भाजप राजकारण करून सरकारे अस्थिर करण्यात व्यस्त आहे. राहुल गांधी यांच्या विरोधात रचलेल्या कटाचा आम्ही निषेध करतो, असे ते म्हणाले. विरियटो फर्नांडिस, दक्षिण गोवा‌ जिल्हाध्यक्ष सावियो डिसिल्वा व युवक काँग्रेसचे अध्यक्ष जोएल आंद्राद यांची भाषणे झाली.

Goa Congress
FC Goa : इकेर ग्वॉर्रोचेनाचा एफसी गोवाला 'बायबाय'

राहुल गांधींना भाजप घाबरते!

महिला अध्यक्षा बीना नाईक म्हणाल्या, भाजपने राहुल गांधींच्या विरोधात सरकारी यंत्रणेचा वापर केला आहे. भारत जोडो यात्रेला मिळालेल्या प्रतिसादानंतर व कर्नाटकातील अपयशामुळे भाजप त्यांना घाबरत आहे. म्हणूनच त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे. भाजप सरकार लोकांमध्ये फूट पाडून राज्य करण्याचे धोरण राबवत आहे. येथे कायदा आणि सुव्यवस्था कोलमडली आहे,

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com