Goa Monsoon 2023
Goa Monsoon 2023Dainik Gomantak

Goa Monsoon 2023: राज्यात 8 जुलै ते 10 जुलै पावसाचा यलो अलर्ट; गोवा वेधशाळेची माहिती

अग्निशमन दलाकडे झाडे पडल्याचे गेल्या 12 दिवसात 450 कॉल
Published on

Goa Monsoon 2023: गोव्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. दरम्यान, 8 जुलै ते 10 जुलै या काळात गोव्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. गोवा वेधशाळेने ही माहिती दिली आहे. यलो अलर्ट हा ऑरेंज आणि रेड अलर्टच्या तुलने कमी धोकादायक असतो.

गोव्यातील दोन्ही जिल्ह्यासाठी हा यलो अलर्ट असणार आहे. 8 ते 10 जुलै या काळात किनारपट्टी भागात वादळी पाऊस असेल. 45 ते 55 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहतील. या काळात मच्छीमारांना समुद्रात न जाण्याबाबत इशारा देण्यात आला आहे.

Goa Monsoon 2023
Babush Monserrate: मंत्री बाबुश मोन्सेरात, आमदार जेनिफर मोन्सेरात यांचा मडगाव कोर्टात अर्ज

26 जून ते 7 जुलै या 12 दिवसांच्या कालावधीत गोव्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. 26 जुनपुर्वी राज्यात कमी पाऊस झाला होता. तेव्हा पावसाने सरासरीही गाठली नव्हती. पण या 12 दिवसात झालेल्या पावसाने ही तूट भरून काढली आहे. उलट सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.

दरम्यान, या 12 दिवसांच्या काळात राज्यात अग्निशमन दलाकडे झाडे पडल्याच्या तसेच इतर असे एकूण 450 कॉल नोंद झालेले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com