Plantation In Goa: कौतुकास्पद! गोमंतकीयांनी 7 महिन्‍यांत लावली 3.55 लाख रोपटी; ‘एक पेड माँ के नाम’मध्ये उत्स्फूर्त सहभाग

Ek Ped Maa Ke Naam Goa: गोव्‍यानेही मोहिमेत सहभागी होऊन १ एप्रिल ते ११ नोव्‍हेंबर या कालावधीत तब्‍बल ३,५५,८३२ रोपटी लावल्‍याचे मंत्री कीर्ती वर्धन सिंग यांनी उत्तरातून सादर केलेल्‍या आकडेवारीतून दिसून येते.
One Ped Maa Ke Naam campaign Goa
One Ped Maa Ke Naam campaign GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: केंद्र सरकारच्‍या ‘एक पेड माँ के नाम’ या मोहिमेअंतर्गत गोमंतकीयांनी अवघ्‍या सात महिन्‍यांत सुमारे ३.५५ लाख रोपटी लावल्‍याचे केंद्रीय पर्यावरण, वन आणि वातावरण बदल राज्‍यमंत्री कीर्ती वर्धन सिंग यांनी लोकसभेतील लेखी प्रश्‍‍नाला दिलेल्‍या उत्तरातून समोर आले आहे.

मातृत्वाचा सन्मान करणे आणि पर्यावरण संवर्धनास प्रोत्साहन देण्‍याच्‍या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गतवर्षी जागतिक पर्यावरण दिनी ‘एक पेड माँ के नाम’ ही मोहीम देशभर राबवण्‍याचे आवाहन केले. त्‍यानुसार देशभरातील सर्वच राज्‍यांनी या मोहिमेत सहभाग दर्शवला.

One Ped Maa Ke Naam campaign Goa
Goa Green Buildings: कॉंक्रिटीकरणाने ग्रस्त झालेल्या गोव्यासाठी ‘हरित इमारत’ हाच पर्याय, पुढाकार घेणे गरजेचे

गोव्‍यानेही मोहिमेत सहभागी होऊन १ एप्रिल ते ११ नोव्‍हेंबर या कालावधीत तब्‍बल ३,५५,८३२ रोपटी लावल्‍याचे मंत्री कीर्ती वर्धन सिंग यांनी उत्तरातून सादर केलेल्‍या आकडेवारीतून दिसून येते.

One Ped Maa Ke Naam campaign Goa
Green Tax: हरित करावरुन विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी मुख्यमंत्री सावंतांना घेरले; CM म्हणाले, 'नंतर उत्तर देऊ'

उत्तर प्रदेशमध्‍ये ४२.१० कोटी रोपटी

या काळात देशभरात सुमारे ११३.९९ कोटी रोपटी लावण्‍यात आली. त्‍यात सर्वाधिक सुमारे ४२.१० कोटी रोपटी उत्तर प्रदेशमध्‍ये लावण्‍यात आली. त्‍यानंतर राजस्‍थान (१४.४४ कोटी), तेलंगण (११.७० कोटी), गुजरात (१०.९१ कोटी), ओडिशा (७.५४ कोटी), मध्‍यप्रदेश (६.४६ कोटी), महाराष्‍ट्र (३.१७ कोटी) आणि कर्नाटक (२.६८ कोटी) या राज्‍यांचा क्रमांक लागत असल्‍याचेही आकडेवारीतून समोर आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com