Goa Assembly Election: 'जागावाटप नंतर, आधी एकत्र या!' 2027 च्या रणधुमाळीसाठी काँग्रेसने फुंकले रणशिंग; 'आप'सोबत आघाडीच्या हालचालींना वेग

Goa Congress AAP Alliance: जागावाटपाचा निर्णय नंतरच्या टप्प्यावर घेतला जाईल आणि सर्वप्रथम सर्वांनी एकत्र येणे हीच प्राथमिकता आहे, असे चोडणकर यांनी सांगितले.
Goa Congress AAP Alliance
Goa Assembly ElectionDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्यातील भाजप सरकारला २०२७ मध्ये पराभूत करावयाचे असल्यास सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावे, यासाठी काँग्रेसने सर्वपक्षीय आघाडीसाठी पुढाकार घ्यावा, असे जनमत समोर आले असल्यामुळे आम आदमी पक्षाबरोबर आघाडीविषयी चर्चा केली जाईल, असे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी ‘गोमन्तक’ला सांगितले.

आघाडी तयार झाल्यानंतरच जागावाटपावर चर्चा होणार, असे सांगत चोडणकर यांनी माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर हे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहेत, असा निर्वाळाही दिला. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)ने आघाडीविषयक चर्चेला आपला पाठिंबा दर्शविला.

Goa Congress AAP Alliance
Goa Congress: फसवणूक करणाऱ्यांना पाठीशी घालू नये, चिट्टी बाबू घंटावर कारवाई कधी? काँग्रेसचा सरकारला सवाल

जागावाटपाचा निर्णय नंतरच्या टप्प्यावर घेतला जाईल आणि सर्वप्रथम सर्वांनी एकत्र येणे हीच प्राथमिकता आहे, असे चोडणकर यांनी सांगितले. आघाडीबाबतची चर्चा एका बैठकीत पूर्ण होत नाही; त्यासाठी विश्वास हळूहळू निर्माण करावा लागतो, असेही ते म्हणाले.

दरम्यान, या चर्चेनंतर जुझे फिलीप डिसोझा यांनी सांगितले की, आमच्या पक्षश्रेष्ठींच्या सूचनांनुसार प्रमुख विरोधी पक्ष म्हणून काँग्रेससोबत चर्चा करण्यासाठी आम्ही आलो आहोत.

Goa Congress AAP Alliance
Goa Congress: शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींविरोधात काँग्रेसची 'छात्रों की गुंज' मोहीम; पेपरफुटी, बेरोजगारीविरोधात राज्यात जनजागृती

ठाकरे,पवार गटाचीही घेतली भेट

चोडणकर यांनी दिलेल्या निमंत्रणानुसार विविध राजकीय पक्षांचे नेते सध्या त्यांच्या भेटीसाठी येऊ लागले आहेत. गोवा फॉरवर्ड, आरजीपी, आप, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) या पक्षांचा त्यात समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

त्यानुसार आज राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे प्रदेशाध्यक्ष जुझे फिलीप डिसोझा, अविनाश भोसले आणि इतर पदाधिकाऱ्यांनी चोडणकर यांच्यासह काँग्रेस कार्यकारी समितीची भेट घेत आघाडीबाबत प्राथमिक चर्चा केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com