Colva Beach: 'आयकॉनिक बीच'ला फेकल कॉलिफॉर्मचे ग्रहण

आयकॉनिक बीच : फेकल कॉलिफॉर्मचे प्रमाण वाढले
Colva Beach
Colva BeachDainik Gomantak

Colva Beach दक्षिण गोव्‍यातील प्रमुख आणि अतिशय सुंदर अशा कोलवा समुद्रकिनाऱ्याला ‘आयकॉनिक बीच’चे बिरुद लावून तेथे सौंदर्यीकरण करण्‍याचा निर्णय सरकारने घेतला आहे. परंतु या किनाऱ्यावर होणाऱ्या प्रदूषणावर उपाययोजना करण्‍यास सरकारला अपयश आले आहे.

या समुद्राला जोडणारी खाडी प्रचंड प्रदूषित झाली असून त्‍यातील फेकल कॉलिफॉर्मच्‍या प्रमाणात बेसुमार वाढ झालेली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने या खाडीतील पाण्‍याचे नमुने तपासल्‍यावर ही बाब पुढे आली आहे.

Colva Beach
Goa Rain: पावसामुळे वाढताहेत पडझडीच्या घटना; हरमलमध्ये विजेच्या तारांवर कोसळले झाड, मात्र...

सदर खाडीमध्‍ये फेकल कॉलिफॉर्मचे प्रमाण शंभर मिलिमीटर पाण्‍यात 780 युनिट एवढे प्रचंड आहे. मानवी विष्‍ठा आणि इतर कुजके पदार्थ या खाडीत टाकले जात असल्‍यामुळे हे प्रमाण वाढले आहे.

फेकल कॉलिफॉर्मचे प्रमाण जास्‍त असलेले पाणी पिण्‍यास वापरले तर अतिसार किंवा कावीळसारखे गंभीर रोग होण्‍याची शक्‍यता असते.

यापूर्वी ‘कोलवा सिव्‍हिक फोरम’ या संघटनेने या प्रकारावर लक्ष वेधले होते. कोलवा किनाऱ्यावरील या खाडीच्‍या काठावर जी हॉटेल्‍स, रेस्‍टॉरंट्‌स आहेत, ती आपले सांडपाणी सरळ या खाडीत सोडतात.

Colva Beach
Margao Ravindra Bhavan: 18 महिन्यांच्या प्रतिक्षेनंंतर रवींद्र भवनात अध्यक्षांची नियुक्ती

प्रकल्‍पाला परवानगी नाही

कोलवा भागातील पाण्‍यावर प्रक्रिया करण्‍यासाठी जो 40 केएलडी क्षमतेचा प्रक्रिया प्रकल्‍प उभारला गेला आहे, त्‍या प्रकल्‍पाला अजून जलस्रोत खात्‍याकडून वापर परवानगी देण्‍यात आलेली नाही. हा प्रकल्‍प सुरू करण्‍यापूर्वी ही परवानगी घेण्‍यात यावी, अशी शिफारस प्रदूषण नियंत्रण मंडळाने केली आहे.

Colva Beach
Goa Monsoon Update: मोसमी पावसाला दमदार सुरूवात; शेती कामांना वेग

वार्का येथील खाडीही प्रदूषित

कोलवाजवळ असलेल्‍या वार्का समुद्रकिनाऱ्याला जोडणारी खाडीही अशाच प्रकारे प्रदूषित झाल्‍याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्‍या तपासणीत सिद्ध झाले आहे.

या प्रदूषणाविरोधात या भागातील सामाजिक कार्यकर्ते वॉरन आलेमाव यांनी यापूर्वी आवाज उठविला होता. परंतु अद्याप उपाययोजना करण्‍यात आलेली नाही.

Colva Beach
Panaji GIS Survey: मालमत्ता कर चुकवणाऱ्यांना बसणार आळा; पणजीतील वास्तुंचे होणार GIS सर्व्हेक्षण

कोलवा समुद्रकिनाऱ्यावर दररोज किमान पाच हजार तरी पर्यटक येत असतात. शनिवार-रविवारी सुट्टीच्‍या दिवशी ही संख्‍या दुप्‍पट असते. हे पर्यटक खाडीत कचरा टाकणारच नाहीत असे गृहित धरू नये.

यामुळे ही खाडी कामगार लावून दररोज साफ करावी असा प्रस्‍ताव मी आमदार या नात्‍याने जलस्रोत खात्‍याला दिला होता. त्‍यासाठी सहा महिन्‍यांत 15 लाख रुपये खर्च आला असता.

मात्र हा खर्च जास्‍त असल्‍याचे नमूद करून जलस्रोत खात्‍याचे मुख्‍य अभियंते प्रमोद बदानी यांनी तो मंजूर केला नाही. ही खाडी प्रदूषणमुक्‍त करावयाची असेल तर ती रोज स्‍वच्‍छ करण्‍याशिवाय पर्याय नाही. - व्‍हेंझी व्‍हिएगस, बाणावलीचे आमदार

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com