Goa Monsoon Update: मोसमी पावसाला दमदार सुरूवात; शेती कामांना वेग

आता विश्रांती नाहीच : भात पेरणीसाठी लगबग झाली सुरू
Goa Monsoon Update
Goa Monsoon UpdateDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Monsoon Update राज्यात मोसमी पावसाला दमदार सुरूवात झाल्याने बळीराजा सुखावला आहे. भाताची पेरणी केल्यानंतर पाऊस गायब झाला होता. त्‍यामुळे भातरोपणीचा प्रश्‍न निर्माण झाला होता. रामभरोसे म्हणत काही शेतकऱ्यांनी पेरणीला सुरूवात केली.

त्‍यांचा अंदाज खरा ठरला आणि गेल्‍या दोन दिवसांपासून राज्यात दमदार पावसाला सुरूवात झाल्याने मोठ्या प्रमाणात शेतीची अडलेली कामे पुन्हा सुरू झाली. त्‍यामुळे बळीराजा सुखावला आहे.

राज्यात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात भाताचे पीक घेतले जाते. चांगल्या पावसानंतर भात लागवडीला सुरूवात होते. यंदा मॉन्सून उशिरा झाला व नंतर मोसमी पाऊस मंदावल्याने शेतकरी हैराण झाला.

Goa Monsoon Update
Goa Rain: पावसामुळे वाढताहेत पडझडीच्या घटना; हरमलमध्ये विजेच्या तारांवर कोसळले झाड, मात्र...

परंतु आता मोठ्या प्रमाणात काणकोण, सांगे, सत्तरी, डिचोली, बार्देश तालुक्यात भात लागवडीला सुरूवात झाली आहे.

यंदा आंतराष्ट्रीय भरड धान्य वर्ष असल्याने आपल्या स्थानिक पातळीवरील भरड धान्यांच्या उत्पादनात वाढ व्हावी यासाठी कृषी संचालनालयाद्वारे लागवडीसाठी मोफत नाचणी शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.

त्यासोबतच नाचणी पिकात वाढ व्हावी तसेच पारंपरिक नाचणी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांनीही मोठ्या प्रमाणात नाचणीचे उत्पादन घ्यावे यासाठी कृषी संचालनालयाद्वारे प्रयत्न सुरू आहेत.

Goa Monsoon Update
Margao Ravindra Bhavan: 18 महिन्यांच्या प्रतिक्षेनंंतर रवींद्र भवनात अध्यक्षांची नियुक्ती

राज्यात मॉन्सून उशिरा दाखल झाल्याने शेतीची कामे रखडली होती. परंतु आता पुन्हा नव्याने कामाला सुरूवात झाली आहे.

राज्यात सुमारे 1 लाख 44 हजार हेक्टर क्षेत्रफळावर विविध पिके घेतली जातात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कृषी संचालनालय सज्ज आहे. शेतीसाठी लागणारे बियाणे व इतर वस्‍तू कृषी संचालनालयाकडे उपलब्‍ध आहेत.

- नेव्हिल आल्फोन्सो, कृषी संचालक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com