Margao Ravindra Bhavan: 18 महिन्यांच्या प्रतिक्षेनंंतर रवींद्र भवनात अध्यक्षांची नियुक्ती

अध्यक्षपदी सिनेनिर्माते, दिग्दर्शक राजेंद्र तालक तर उपाध्यक्षपदी फातोर्डा भाजप मंडळाचे अध्यक्ष मनोहर बोरकर यांची नियुक्ती
Manohar Borkar and Rajendra Talak
Manohar Borkar and Rajendra TalakDainik Gomantak

Margao Ravindra Bhavan जवळ जवळ 18 महिने अध्यक्षपद व उपाध्यक्षपद रिक्त राहिल्यानंतर आता मडगावच्या रवींद्र भवनच्या अध्यक्षपदी सिनेनिर्माते, दिग्दर्शक राजेंद्र तालक तर उपाध्यक्षपदी फातोर्डा भाजप मंडळाचे अध्यक्ष मनोहर बोरकर यांची नियुक्ती सरकारने केली आहे.

नियुक्तीचे आदेश कला व संस्कृती खात्याचे संचालक सगुण वेळीप यांनी जारी केले आहेत.

या नियुक्तीबद्दल राजेंद्र तालक यांच्याशी संपर्क साधला असता त्‍यांनी सांगितले की, नियुक्तीबद्दल आपल्याला आजच कळले. उद्या म्हणजे शुक्रवारी आपण अध्यक्षपदाचा ताबा घेण्यासंदर्भात निर्णय घेऊन व सोमवारपर्यंत ताबा घेऊ.

Manohar Borkar and Rajendra Talak
Dr. Pramod Sawant ठरले सर्वाधिक काळ सत्तेवर राहणारे मुख्यमंत्री; वाचा माजी मुख्‍यमंत्र्यांचा सत्तेवरील कालावधी

राजेंद्र तालक यापूर्वी 2017 ते 2020 या कालावधीत गोवा राज्य मनोरंजन सोसायटीच्या उपाध्यक्षपदी होते. शिवाय पश्र्चिम विभाग सांस्कृतिक केंद्राचे व मनोरंजन सोसायटीचेही ते कार्यकारी सदस्य आहेत.

तालक यांनी आठ चित्रपटांची निर्मिती केली असून ‘आलिशा’ व ‘अंतर्नाद’ या दोन चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

शिवाय गोवा राज्य चित्रपट महोत्सवात त्यांना 50 पुरस्कार प्राप्त झाले आहेत. मडगावच्या रवींद्र भवनाला आपण गतवैभव प्राप्त करुन देण्याचा प्रयत्न करू असे तालक यांनी सांगितले.

फातोर्डेचे माजी आमदार व भाजपचे राज्य सरचिटणीस दामू नाईक यांनी तालक व बोरकर यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com