Panaji GIS Survey: मालमत्ता कर चुकवणाऱ्यांना बसणार आळा; पणजीतील वास्तुंचे होणार GIS सर्व्हेक्षण

नागपुरच्या एजन्सीला काम
Goa Panaji Municipality
Goa Panaji MunicipalityDainik Gomantak
Published on
Updated on

Panaji GIS Survey: गोव्याची राजधानी पणजी शहरातील सर्व मालमत्तांचे भौगोलिक माहिती प्रणाली (Geographical Information System) आधारित सर्वेक्षण केले जाणार आहे. प्रामुख्याने शहरातील विद्यमान मालमत्तांचा तपशीलवार डेटाबेस यातून तयार केला जाणार आहे.

नागपुरच्या मेसर्स कोल्ब्रो ग्रुप प्रा. लि. या कंपनीला सर्वेक्षणाचे काम देण्यात आले आहे. पुढील आठवड्यात या कामाला सुरवात होऊ शकते.

Goa Panaji Municipality
Goa Rainfall: राज्यात 7 दिवसात बरसला 392 मिलीमीटर पाऊस; आजही ऑरेंज अलर्ट

जीआयएस-आधारित सर्वेक्षणामुळे पणजीतील निवासी आणि व्यावसायिकांसह सर्व मालमत्तांचे मूल्यांकन होईल. यातून शहरातील मालमत्तांचा स्पष्ट आणि तपशीलवार चित्र समोर येणार आहे. यातून महापालिकेची कर गळती देखील रोखली जाणार आहे.

या सर्व्हेक्षणाचा फायदा ड्रेनेज सिस्टिमपासून इतर पायाभूत सुविधांच्या विकासालाही होणार आहे. महापालिकेच्या माहितीनुसार गोवा राज्य नागरी विकास संस्था (GSUDA) ने हे काम मेसर्स कोल्ब्रो ग्रुप प्रा. लि. ला दिले आहे.

कंपनीचे प्रतिनिधी महापालिका क्षेत्रातील प्रत्येक घराला भेट देतील. या प्रतिनिधींना आवश्यक ती माहिती द्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com