CM Helps Accident Victim: मुख्यमंत्र्यांमधील 'डॉक्‍टर'झाला जागा! ताफा थांबवून अपघातग्रस्त युवकावर केले उपचार

Pramod Sawant Helps Injured Youth in Goa: पेशाने डॉक्टर असलेले मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बुधवारी न्हावेली-साखळी येथे आपला वाहनांचा ताफा थांबवून अपघातात जखमी झालेल्या युवकावर प्राथमिक उपचार केले.
Chief Minister gives first aid to accident victim
Chief Minister stops convoy to help accident victimDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

साखळी: पेशाने डॉक्टर असलेले मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बुधवारी न्हावेली-साखळी येथे आपला वाहनांचा ताफा थांबवून अपघातात जखमी झालेल्या युवकावर प्राथमिक उपचार केले. त्यांच्या या तत्परतेचे पंचक्रोशीतून कौतुक होत आहे.

न्हावेली येथील श्री बेताळ मंदिराजवळ गुरांची धडक बसल्याने वेळगे येथील सुदेश वेळगेकर या युवकाचा दुचाकीवरील ताबा सुटून अपघात झाला. त्याच्या डोक्याला मार लागून रक्तस्राव सुरू झाला. त्याचवेळी पणजीच्या दिशेने जाणारे मुख्यमंत्री सावंत यांच्या निदर्शनास ही घटना आली. त्यांनी तातडीने आपला ताफा थांबवून जखमी युवकाच्या डोक्यातून होणारा रक्तस्राव रोखण्‍यासाठी पट्टी बांधली.

Chief Minister gives first aid to accident victim
Goa Politics: निवडणुकीची तारीख जाहीर होताच मगो 'पत्ते' उघडणार! युती, जागावाटपाचा निर्णय संसदीय समितीकडे

त्‍यानंतर लागलीच मुख्यमंत्र्यांनी १०८ रुग्णवाहिकेला पाचारण केले; मात्र ती तातडीने उपलब्ध न झाल्याने आपल्या ताफ्यातील वाहनातून जखमी युवकाला बेतकी आरोग्य केंद्रात पाठवले. तेथून त्याला पुढील उपचारांसाठी बांबोळी येथील गोमेकॉत हलवण्यात आले.

डॉक्टर म्हणून कर्तव्याची जाणीव

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यापूर्वीही काणकोण येथील अपघातावेळी ताफा थांबवून जखमींना मदत केली होती. न्हावेली येथेही त्यांनी जखमी युवकाच्या डोक्याला पट्टी बांधून रक्तस्राव रोखण्याचा प्रयत्न केला आणि रुग्णवाहिकेला बोलावले. रुग्णवाहिका तातडीने उपलब्ध न झाल्याने आपल्‍या ताफ्यातील वाहनातून अपघातग्रस्‍त युवकाला आरोग्य केंद्रात पाठवण्याची व्यवस्था केली. पदाची जबाबदारी सांभाळतानाच वैद्यकीय सेवेची जाणीव जपल्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.

Chief Minister gives first aid to accident victim
Goa Agriculture: सत्तरीत सुपारीच्या तोडणीला जोर; कुशल कामगारांची धावपळ, दरवाढीची मागणी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

CM pramod sawant kannada remark controversy
goa cm pramod sawant peons warning
cm pramod sawant criticizes rahul gandhi
cm pramod sawant
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com