Goa Politics: निवडणुकीची तारीख जाहीर होताच मगो 'पत्ते' उघडणार! युती, जागावाटपाचा निर्णय संसदीय समितीकडे

MGP BJP Alliance: पणजी येत्‍या विधानसभा निवडणुकीत भाजपसोबतची युती आणि जागावाटपाबाबतचा निर्णय घेण्‍याचे पूर्ण अधिकार मगोच्‍या संसदीय समितीला आहेत.
MGP BJP Alliance
Goa PoliticsDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: येत्‍या विधानसभा निवडणुकीत भाजपसोबतची युती आणि जागावाटपाबाबतचा निर्णय घेण्‍याचे पूर्ण अधिकार मगोच्‍या संसदीय समितीला आहेत. ही समितीच याबाबत योग्‍य तो निर्णय घेईल आणि निवडणुकीची तारीख जाहीर झाल्‍यानंतरच यावर शिक्‍कामोर्तब होईल, असे मंत्री तथा मगोचे ज्येष्‍ठ नेते सुदिन ढवळीकर यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना स्‍पष्‍ट केले.

येत्‍या विधानसभा निवडणुकीतील भाजप-मगो युती आणि जागावाटप कधीपर्यंत जाहीर होऊ शकते?, असा प्रश्‍‍न पत्रकारांनी केला असता, मगो पक्षाची आमसभा येत्‍या ३१ रोजी होणार आहे. त्‍यानंतर पक्षाच्‍या कार्यकारी समितीची बैठक होईल. या दोन्‍ही बैठकांत भाजपसोबतची युती तसेच जागावाटपाबाबत चर्चा करण्‍यात येईल.

MGP BJP Alliance
Goa Agriculture: सत्तरीत सुपारीच्या तोडणीला जोर; कुशल कामगारांची धावपळ, दरवाढीची मागणी

त्‍यानंतर पक्षाच्‍या संसदीय समितीच्‍या बैठकीत अंतिम निर्णय घेऊन तो कार्यकारी समितीकडे पाठवला जाईल. निवडणुकीची तारीख जाहीर झाल्‍यानंतर मगो पक्ष युती आणि जागांबाबतची भूमिका स्‍पष्‍ट करेल, असे ढवळीकर म्‍हणाले. मगो पक्षाने सध्‍या १२ मतदारसंघांत काम सुरू केले असून, १७ मतदारसंघांत पक्षाच्‍या समित्‍या आहेत. त्‍यात यावेळचा निवडणूक सर्व्हे मगोसाठी सकारात्‍मक आलेला आहे, असेही ढवळीकर यांनी नमूद केले.

पक्षांतराला आपला कायम विरोधच

आमदारांच्‍या पक्षांतरामुळे गोव्‍याची देशभर बदनामी होत आहे. पक्षांतरास आपण २००० पासून विरोध करत असून, तो कायम असेल, असे मंत्री ढवळीकर म्‍हणाले. आपापल्‍या पक्षांना पुढे न्‍यायचे असेल, तर त्‍या पक्षांनी प्रामाणिक कार्यकर्त्यांना योग्‍य स्‍थान आणि संधी देणे गरजेचे आहे, असे सांगून ढवळीकर यांनी आमदार राजेश फळदेसाई यांनी केलेल्‍या टीकांना उत्तर देणे टाळले.

MGP BJP Alliance
Goa Freedom Fighter: 10 वर्षांचा एकांतवास, मृत्यूची खोटी बातमी अन् मायभूमीची ओढ; गोव्याचे लोहपुरुष नारायण हरी नाईक यांची संघर्षगाथा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com