BJP मंत्र्याचे सेक्स स्‍कँडल प्रकरण हाताळण्यात मुख्यमंत्री सावंत अपयशी

‘अत्याचारग्रस्त महिलेने तक्रार द्यावी, मग संबंधित मंत्र्यावर कारवाई करतो’ असे वक्तव्‍य मुख्यमंत्री सावंत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी केले होते.
Goa CM pramod  Sawant fails to handle BJP ministers sex scandal case
Goa CM pramod Sawant fails to handle BJP ministers sex scandal caseDainik Gomantak

पणजी: मंत्र्याचे (BJP Ministers) सेक्स स्कँडल प्रकरण हाताळण्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) सपशेल अपयशी ठरले आहेत. त्‍यामुळे त्‍यांनी तातडीने पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर (Girish Chodankar) यांनी केली. तथापि, चोडणकर यांना संबंधित महिलेने कायदेशीर नोटीस बजावली असून पुरावे सार्वजनिक करू नयेत, असे या नोटिसीत म्हटले आहे.

‘अत्याचारग्रस्त महिलेने तक्रार द्यावी, मग संबंधित मंत्र्यावर कारवाई करतो’ असे वक्तव्‍य मुख्यमंत्री सावंत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी केले होते. त्‍यावर चोडणकर यांनी सरकारवर टीकेची झोड उठवत मुख्यमंत्रीच या मंत्र्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप करून त्‍यांनी ताबडतोब खुर्ची सोडावी, अशी मागणी केली आहे. मंत्र्याचे हे सेक्‍स स्‍कँडल प्रकरण दिवसेंदिवस गुंतागुंतीचे बनत चालले आहे. निवडणुकीच्या तोंडावर हे प्रकरण भाजपला चांगलेच शेकणार असल्‍याची चिन्‍हे दिसू लागली आहेत.

Goa CM pramod  Sawant fails to handle BJP ministers sex scandal case
कांदोळी येथील ‘टॉय बीच क्लब’ला दणका

गिरीश चोडणकर यांना मुंबईच्या ‘यशस लीगल’ या कायदेशीर सल्लागार संस्थेच्या वतीने संबंधित महिलेकडून कायदेशीर नोटीस आली आहे. यावर पत्रकार परिषदेत चोडणकर म्‍हणाले की, मुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. हे प्रकरण दाबण्यासाठी तो मंत्री सर्व ते प्रयत्‍न करू लागला आहे. मुख्यमंत्र्यांनी त्‍याला तातडीने मंत्रिमंडळातून हटवावे. अन्यथा ठरल्याप्रमाणे 15 दिवसांनंतर या मंत्र्याचे नाव आपण जाहीर करणार आहे. तसेच अशा कायदेशीर नोटिशीला उत्तर देण्याचीही आवश्यकता नाही, असेही चोडणकर म्‍हणाले. या पत्रकार परिषदेला आमदार आलेक्‍स रेजिनाल्‍ड लॉरेन्‍स, विजय भिके, संगीता परब आणि मान्‍यवरांची उपस्‍थिती होती.

काय आहे नोटिसीत?

मुंबईच्या ‘यशस लीगल’ या कायदेशीर सल्लागार संस्थेच्या वतीने ‘लॉयर्स फॉर जस्ट सोसायटी’ या एनजीओ संस्‍थेच्या साहाय्याने गिरीश चोडणकर यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटिशीवर ज्योती घोरपडे, सीमा कुलकर्णी, राजलक्ष्मी पंजाबी, ए. एस. पुनाळेकर, सुनीता खंडाळे आणि आर. नायर यांची नावे आहेत. नोटिसीत संबंधित महिलेसंदर्भातील कोणतेही पुरावे सार्वजनिक करू नयेत, असे म्हटले आहे. अन्यथा या प्रकरणात आपणाला जबाबदार धरून कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही म्हटले आहे.

Goa CM pramod  Sawant fails to handle BJP ministers sex scandal case
गोमंतकीयांचे अंतिम सुनावणीकडे लक्ष! ‘त्या’ 12 आमदारांचे आज काय होणार?

मंत्री सेक्स स्कँडलप्रकरणी गिरीश चोडणकर यांच्यावर राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न होत असून मात्र आम्ही हा विषय गांभीर्याने आणि जबाबदारीने घेतला असून आमच्याकडे पुरेसे पुरावे आहेत, हे सिद्ध करू.

- पी. चिदंबरम, नेते, काँग्रेस.

संबंधित महिला ही गरीब आहे. मुंबईसारख्या शहरातल्या कायदेशीर सल्लागार संस्थेची मदत घेण्याइतकी आणि त्यांची फी देण्याइतकी तिला पैसे कुणी पुरवले, याबाबत शंका आहे. मी यापूर्वी संबंधित मंत्र्याचे किंवा संबंधित महिलेचे नाव जाहीर केलेले नाही. त्यामुळे एका अर्थाने हा नवा पुरावा या मंत्र्याने दिला आहे. याला उत्तर देण्याची मुळीच आवश्यकता नाही. तसेच अशा प्रकारच्या दबावाला आम्ही बळी पडणार नाही.

- गिरीश चोडणकर, प्रदेशाध्‍यक्ष, काँग्रेस

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com