Mahadayi चा उगम आणि शेवटचे टोक माहीत नसलेल्यांनी मला शहाणपण शिकवू नये; सीएमचा विरोधकांना टोला

आमदार होण्यापूर्वी आपण 'म्हादई' आंदोलनात सक्रिय भाग घेतला आहे : मुख्यमंत्री डॉ. सावंत
CM DR. Pramod Sawant
CM DR. Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

Mahadayi Water Dispute: मोपा विमानतळ आणि मायनिंगची लढाई जिंकण्यात सरकारला यश आले आहे. आता 'म्हादई'ची लढाईही सरकार निश्चितच जिंकणार असा ठाम विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला. 'म्हादई'वरून कोणीही राजकारण करू नये असा सल्लाही त्यांनी दिला. आज रविवारी साखळी येथील रवींद्र भवनात एका कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. सावंत बोलत होते.

CM DR. Pramod Sawant
Goa Mining : पन्नास वर्षांसाठी शाश्वत खाण व्यवसाय सुरू करणार : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

'म्हादई'चा वाद हा काही नवीन नाही. गेल्या तीस वर्षांपासून 'म्हादई'चा वाद आहे. त्यासाठी कायदेशीर लढाईही सुरु आहे असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले. आमदार होण्यापूर्वी आपण 'म्हादई' आंदोलनात सक्रिय भाग घेतला आहे असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले. काहीजणांना म्हादईचा उगम कोठून झालाय आणि ती कोठे समाप्त झालीय ते माहीत नाही. मात्र ते 'म्हादई'वरून भाषणे ठोकतात असा टोला मुख्यमंत्र्यांनी हाणून अशा लोकांनी मला शहाणपणा शिकवू नये असा सल्ला दिला.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची काम करण्याची पद्धत पाहता, 'म्हादई'चा गुंता सोडवण्याची जबाबदारी ते समर्थपणे पेलतील. असा विश्वास राज्यसभेचे खासदार विनय तेंडुलकर यांनी व्यक्त केला आहे.

CM DR. Pramod Sawant
Old Goa Murder Case : त्या 12 वर्षीय मुलीचा पित्यानेच 'का' केला खून; धक्कादायक कारण आले समोर

दरम्यान, म्हादईचा विषय सध्या तापत असतानाच फोंड्यातील मुस्लीम संघटनेनेही या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. आज रविवारी फोंड्यातील नुरानी मशिदीत नमाज पढल्यावर मुस्लीम संघटना फोंडा या बॅनरखाली मुस्लीम बांधवांनी म्हादई आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. म्हादईच्या लढ्यात आम्ही सक्रिय सहभागी होऊ अशी ग्वाही या संघटनेतर्फे देण्यात आली. म्हादई ही गोव्याची जीवनदायिनी असून म्हादईचे अपहरण कर्नाटकला करू देणार नाही त्यासाठी आंदोलनात सक्रिय राहू असेही यावेळी सांगण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com