Old Goa Murder Case : त्या 12 वर्षीय मुलीचा पित्यानेच 'का' केला खून; धक्कादायक कारण आले समोर

जुने गोवे पोलिसांनी केली संशयिताला अटक
father killed daughter
father killed daughterDainik Gomantak
Published on
Updated on

Old Goa Murder Case : संशय आणि रागाच्या भरात स्वतःच्याच 12 वर्षांच्या मुलीचा निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना चोडण येथे उघडकीस आली आहे. येथील सलुईस गेट देवगी मानशीजवळ माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना उघडकीस आली.

मूळ बिहारी आणि गेल्या 17 वर्षांपासून गोव्यात राहणाऱ्या मोहम्मद सलीम खातून (वय 34 वर्षे) या नराधम पित्याला अटक केली असून त्याने खुनाची कबूल दिली असल्याची माहिती जुने गोवे पोलिसांनी दिली.

father killed daughter
Goa Temperature: कडाका वाढला! पणजीत सलग तीन दिवस पारा 20C च्या खाली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आपली 12 वर्षांची मुलगी ज्युलिया बेपत्ता असल्याची तक्रार आरोपीनेच गुरुवारी जुने गोवे पोलिसांत दिली होती. त्यानुसार गेल्या तीन दिवसांपासून पोलिस विविध ठिकाणी तपास करत होते. मात्र, संबंधित तक्रारदार पित्याबाबत पोलिसांना संशय आला. तो उलट-सुलट माहिती देत असल्याचे लक्षात येताच त्याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीने खुनाची कबुली दिली.

बुधवारी रात्री संशयिताने आपल्या अन्य मुलांना आणि पत्नीला घराबाहेर हाकलले आणि ज्युलिया हिला बेदम मारहाण केली. त्यातच तिचा जीव गेला. त्यानंतर संशयिताने तिचा मृतदेह मानशीमधील दलदलीत टाकून दिला. मृतदेहाचे हात बांधून तो झाडाला बांधून ठेवला होता. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

father killed daughter
Sadanand Shet Tanavade : म्हादई प्रश्‍न पक्षीय पातळीवर सोडवण्याचा भाजपचा प्रयत्न

घरमालकाकडे मारहाणीची तक्रार

संशयिताचे कुटुंबीय ज्या घरात राहाते, त्या घरमालकाकडे ज्युलिया नेहमी जात होती. आपला बाप कुटुंबातील सर्वांना सतत मारहाण करतो, ही माहिती ती घरमालकाला देत असे. हा रागही संशयिताच्या मनात होता. याशिवाय अन्य संशयही त्याच्या मनात डोकावत होते. यातूनच संशयिताने हे भयंकर कृत्य केल्याची माहिती पुढे आली. मृतदेहाची उत्तरीय तपासणी अद्याप झालेली नाही.

प्रेम संशयाचे भूत मानगुटीवर

संबंधित नराधम बाप हा बांधकाम व्यवसायातील कामगार असून त्याला आठ मुले आहेत. ज्युलिया ही त्याची सर्वांत मोठी मुलगी होती. ती गावातील लोकांकडे घरकाम करत होती, असे स्थानिकांनी सांगितले. गावातील एक तरुण तिच्या मागे लागला होता, अशी चर्चा होती. याच संशयातून मोहम्मदने ज्युलियाला जीवे मारल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com