Goa Mining : पन्नास वर्षांसाठी शाश्वत खाण व्यवसाय सुरू करणार : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

अन्य सर्व खाण ब्लॉकच्या लिलावाची प्रक्रिया पुढील 3 महिन्यांत पूर्ण करणार
Dr. Pramod Sawant
Dr. Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Mining : पुढील पन्नास वर्षांचा विचार करुन राज्यात शाश्वत खाण व्यवसाय सुरु करणार आहे तसेच राज्यातील अन्य सर्व खाण ब्लॉकच्या लिलावाची प्रक्रिया पुढील 3 महिन्यांत पूर्ण करुन खाण व्यवसायाला चालना देण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. खाण व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या लोकांना विविध योजनांद्वारे आधार देणारे आमचे सरकार एकमेव आहे असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले

Dr. Pramod Sawant
Ambergis: गोव्यातून कोल्हापूरात जाणारी दोन कोटींची व्हेल माशाची उलटी जप्त; सिंधुदुर्ग, गोव्यातील सहाजणांना अटक

खाण आणि भुगर्भ खात्यातर्फे रवींद्र भवनात आयोजित केलेल्या या सोहळ्यावेळी मुख्यमंत्र्यांच्याहस्ते सेसा वेदांता कंपनी, साळगावकर शिपिंग प्रा. लि. कंपनी, बांदेकर माईन कंपनी, फोमेंतो रिसॉर्सीस कंपनी या चारही मायनिंग कंपन्यांना इन्टेन्ट (इरादा) पत्रांचे वितरण करण्यात आले. पुढील 50 वर्षांसाठी गोव्याच्या विचार करता या चार कंपन्यांना खाणकाम करण्याचा परवाना देण्यात आला आहे असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

खाणी सुरु करताना खाण कंपन्यांनी पूर्वाश्रमीच्या कामगारांवर अन्याय न करता शक्य त्याप्रमाणे या कामगारांना पुर्वीच्याच हुद्यावर सामावून घ्यावे. खाणी बंद करण्यासाठी खाण विरोधी संघटना तयार आहेत. पुन्हा संकट टाळण्यासाठी खाण व्यवसायात कोणतेही विघ्न येता कामा नये. त्यासाठी विशेषत: खाणग्रस्त भागातील लोकांनी सहकार्य करावे असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावेळी बोलताना केले.

Dr. Pramod Sawant
Old Goa Murder Case : त्या 12 वर्षीय मुलीचा पित्यानेच 'का' केला खून; धक्कादायक कारण आले समोर

डीएमजीचे संचालक सुरेश शानभोगे म्हणाले की, अतिरिक्त खाण ब्लॉकचा लिलाव करण्यासाठी आमंत्रित निविदांची नोटीस (एनआयटी) या महिन्यात जारी केली जाईल तसेच राज्यात पूर्ण प्रमाणात खाणकाम सुरू करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. नुकत्याच झालेल्या लिलावातील विजेत्या बोलीदार कंपन्यांनी खाणकाम सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध परवानग्यांसाठी त्वरित अर्ज करावेत असे आवाहन डीएमजीचे संचालक सुरेश शानभोगे यांनी केले.

विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकारने नवीन धोरणाला मंजुरी दिली होती. अलीकडेच, सरकारच्या खाण खात्याने पहिल्या टप्प्यात डिचोली, शिरगाव-मये, मोंत द शिरगाव या उत्तर गोव्यातील तीन आणि दक्षिण गोव्यातील काले या चार ब्लॉक्सचा ई-लिलाव पूर्ण केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com