Goa: आधी कोविड चाचणी केंद्रे सुरू करा आणि नंतर सीमा खुल्या करा

सरकारच्या घाईगडबडीत घेतलेल्या कोणत्याही निर्णयाला काँग्रेसचा विरोध असेल (Goa)
Goa Pradesh Congress
Goa Pradesh Congress Dainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: गोव्यात कोविडचे रुग्ण कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर गोवा सरकार राज्याच्या सीमा (State Borders) परराज्यातील लोकांना खुल्या करू पाहत असल्याच्या पार्श्वभूमीवर अगोदर सीमा भागात सुसज्ज अशी कोविड चाचणी केंद्रे सुरू करा (Covide Test Centers) आणि नंतरच सीमा खुल्या करा, अशी मागणी काँग्रेसने मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Dr Pramod Sawant) यांच्याकडे केली आहे. काँग्रेस प्रदेश (Goa Pradesh Congress) समितीचे उपाध्यक्ष संकल्प आमोणकर आणि सरचिटणीस जना भंडारी यांनी मुख्यमंत्री आणि इतर संबंधिताना या बाबतीत पत्र लिहून जर सरकारने घाईघाईने कोणताही निर्णय घेतला तर काँग्रेस त्याला विरोध करेल असे म्हटले आहे. (Goa)

Goa Pradesh Congress
Goa: कुठ्ठाळीचा विकास करण्यात स्थानिक लोकप्रतिनिधी अपयशी

गोव्यात 31 जुलै पर्यत सर्वांना कोविडची एक लस देण्याचे उद्दिष्ट पूर्ण होऊ शकलेले नाही, तसेच केरळात कोविड रुग्ण वाढत आहेत या पार्श्वभूमीवर सीमा खुल्या करण्याची घाई नको असेही त्यांनी म्हटले आहे. गोव्यात कोविडचा प्रसार होऊ नये यासाठी कॅसिनो, खनिज वाहतूक, कोळसा वाहतूक यांसारखे उपक्रम बंद ठेवावेत, तसेच सध्या प्राधान्यक्रम नसलेले प्रकल्प बंद ठेवून तो पैसा राज्यातील इस्पितळे सुसज्ज करण्यासाठी व वैद्यकीय सुविधा वाढविण्यासाठी करावा, असे म्हटले आहे. कोविड, तौक्ते वादळ आणि नुकताच आलेला पूर यामुळे ज्या कुणाला आर्थिक झळ बसलेली आहे त्यांना मदत करण्यासाठी राज्यात आपत्ती निवारण निधी जाहीर करून मदत करावी अशी मागणीही करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Karapur One Goa Project Protest
Goa First Alliance 2027
Viresh Borkar RG Goa
Morjai Temple Property Misappropriation
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com