Goa Casino: कॅसिनोसाठी अर्ज करताना गुन्हा नोंद असल्यास परवाना नाही; नंतर गुन्हा दाखल झाल्यास परवाना होणार रद्द...

कॅसिनो चालकांना सादर करावे लागणार क्लिअरन्स सर्टिफिकेट
Goa Casino
Goa CasinoDainik Gomantak

Goa Casino: गोव्यात कॅसिनो चालविण्यासाठी परवाना मागणाऱ्या कॅसिनो चालकांना, अर्जदरांना गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासण्यासाठी पोलिस क्लिअरन्स प्रमाणपत्र सादर करावे लागेल.

कॅसिनो ऑपरेटर आणि अशा अर्जदारांना किंवा कॅसिनोत प्रमुख व्यवस्थापकीय पदांवर असलेल्या कर्मचारी गुन्ह्यात दोषी आढळल्यास त्यांना किमान दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा दिली जाणार आहे.

गोवा सरकारने ‘द गोवा पब्लिक गॅम्बलिंग ऍक्ट, 1976’ मध्ये सुधारणा केली असून सोमवारी सरकारकडून राजपत्र अधिसूचना जारी करण्यात आली. परवाना मिळाल्यानंतर कॅसिनो ऑपरेटर दोषी आढळल्यास, परवाना त्वरित रद्द केला जाईल आणि भरलेले शुल्क सरकार जप्त करेल.

Goa Casino
Goa Crime: उत्तराखंडच्या युवतीवर गोव्यात बलात्कार; जोधपूरमध्ये गुन्हा दाखल

गोव्यात मांडवी नदीतील जहाजांवर सहा ऑफशोर कॅसिनो आणि 10 किनारी कॅसिनो आहेत. रोजगाराचा स्रोत असण्याबरोबरच, हा एक मोठा कमाई करणारा उद्योगदेखील आहे. प्रत्येक ऑफशोअर कॅसिनोची वार्षिक उलाढाल किमान 100 कोटी रुपये आहे.

दरम्यान, कायद्यातील नव्या सुधारणेनुसार कोणतेही प्रमुख व्यवस्थापकीय पद धारण करणार्‍या कोणत्याही व्यक्तीस तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकेल अशा कोणत्याही फौजदारी गुन्ह्यात दोषी आढळल्यास त्याला परवाना दिला जाणार नाही.

जर अशी व्यक्ती परवाना दिल्यानंतर दोषी आढळल्यास, असा परवाना तात्काळ रद्द केला जाईल आणि भरलेले सर्व शुल्क सरकारकडे जप्त केले जाईल.” असे राजपत्र अधिसूचनेत म्हटले आहे.

परवाना मागणाऱ्या कॅसिनो चालकांना गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासण्यासाठी पोलिस क्लिअरन्स प्रमाणपत्र सादर करावे लागेल.

Goa Casino
Goa Education Model: अभिमानास्पद! गोव्याचे कोडिंग, रोबोटिक्स एज्युकेशन मॉडेल आता उत्तर प्रदेश, राजस्थान ओडिशातही...

अर्जदारांना अर्जदार, भागधारक, भागीदार, महत्त्वपूर्ण किंवा नियंत्रित स्वारस्य असलेल्या व्यक्ती आणि वरिष्ठ व्यवस्थापन अधिकारी यांच्याविरुद्ध प्रलंबित फौजदारी खटल्यांच्या तपशीलाशी संबंधित माहिती सरकारला सादर करावी लागेल.

सुधारणांनुसार, कॅसिनो परवाना मिळवू इच्छिणाऱ्या अर्जदारांसाठी, सरकारने भागधारक किंवा भागीदारांच्या नावाची माहिती, महत्त्वपूर्ण किंवा नियंत्रित स्वारस्य असलेल्या व्यक्तींचा तपशील (10 टक्क्यांहून अधिक) आणि कोणत्याही परिस्थितीत कार्यरत असलेल्या इतर कॅसिनो परवान्यांचा तपशील देखील मागवला आहे.

“जर इतर कोणत्याही राज्यातील पूर्वीचे कॅसिनो परवाने रद्द केले गेले असतील, तर अर्जदाराला अर्जामध्ये रद्द करण्याचे कारण उघड करावे लागेल. या सुधारणांचा उद्देश पारदर्शकता आणणे, अनुपालन सुनिश्चित करणे आहे.

दुरुस्तीमधील आणखी एक कलमानुसार गेमिंग कमिशनर किंवा तपासणी अधिकाऱ्याला वेळोवेळी कॅसिनो परिसराची तपासणी करण्याचा अधिकार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com