Goa Crime: उत्तराखंडच्या युवतीवर गोव्यात बलात्कार; जोधपूरमध्ये गुन्हा दाखल

संशयित आरोपी राजस्थानचा
Goa Crime
Goa Crime Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Crime: जोधपूर ग्रामीण जिल्ह्यातील ओसियन तहसीलमधील तरुणाने उत्तराखंडमधील एका तरूणीवरून गोव्यात बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. तरुणीने मथानिया पोलीस ठाण्यात या तरुणाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्मोडा उत्तराखंड येथील रहिवासी असलेल्या एका तरुणीने ओसियान येथील एका तरुणावर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Goa Crime
Goa Education Model: अभिमानास्पद! गोव्याचे कोडिंग, रोबोटिक्स एज्युकेशन मॉडेल आता उत्तर प्रदेश, राजस्थान ओडिशातही...

बलात्काराची घटना गोव्यात झाल्याने जोधपूर पोलिसांत क्रमांक नसलेल्या एफआयआरची नोंद करण्यात आली आहे, असे समजते. ही एफआयआर पुढील तपासासाठी गोवा पोलिसांकडे पाठवण्यात आली आहे.

तरुणी आणि आरोपी तरुण गोव्यात एकत्र काम करतात, अशी माहिती आहे. त्यामुळे दोघांची ओळख झाली. यादरम्यान तरुणाने तिला भूलथापा देत तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तरूण त्याच्या मूळ गाव ओसियनला परतला.

त्यानंतर तरुणाने तरुणीला तिनवारी येथे फिरायलाही बोलावले होते. हे दोघेही ओसियान येथे पर्यटनासाठी गेले होते.

दरम्यान, तरुणाचे सत्य समोर आल्यानंतर पीडितेने पोलिस ठाणे गाठून गुन्हा दाखल केला. लग्नाच्या भूलथापा देऊन तरूणाने संबंधित युवतीला फसविल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Crime And Social Concerns
Maharashtra Tribal Woman Crime
 Goa Facebook Part Time Job Scam
Sai Krishna Custody Death Case
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com