अंतराळ शिक्षण गोमंतकीय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्‍याचा मार्ग मोकळा! 'इस्रो'कडून 'केअर्स'च्‍या 'PMU'ला नोंदणीकृत अवकाश शिक्षक म्‍हणून मान्‍यता

ISRO Registered Space Educator Goa: ‘इस्रो’च्‍या क्षमता बांधणी कार्यक्रम कार्यालयाने (सीबीपीओ) जारी केलेल्या पत्रानुसार, ‘पीएमयू’ला ही मान्यता जून २०२९ पर्यंत वैध आहे.
ISRO Registered Space Educator Goa
ISRODainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: तंत्रशिक्षण संचालनालयाअंतर्गत चालणाऱ्या कोडिंग ॲण्ड रोबोटिक्स एज्युकेशन इन स्कूल्स (केअर्स) योजनेच्या प्रकल्प व्यवस्थापन युनिटला (पीएमयू) भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) अधिकृतरित्‍या ‘इस्रोचे नोंदणीकृत अवकाश शिक्षक’ म्हणून मान्यता दिल्‍याने अंतराळ शिक्षण गोमंतकीय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्‍याचा मार्ग मोकळा झाला आहे.

‘इस्रो’च्‍या क्षमता बांधणी कार्यक्रम कार्यालयाने (सीबीपीओ) जारी केलेल्या पत्रानुसार, ‘पीएमयू’ला ही मान्यता जून २०२९ पर्यंत वैध आहे. त्‍यामुळे ‘पीएमयू’ला विद्यार्थ्यांना अंतराळ शिक्षण देण्‍याचा तसेच त्‍याबाबत जागृती उपक्रम राबवण्याचा पूर्ण अधिकार मिळाला आहे. या मान्यतेमुळे इस्रो-समर्थित अंतराळ शिक्षण कार्यक्रम राबवण्यास अधिकृत असलेल्या निवडक संस्थांच्या गटात आता गोव्याचाही समावेश झाला आहे.

ISRO Registered Space Educator Goa
ISRO Research: सौर वादळांचा उपग्रहांवर परिणाम, 'आदित्य एल-1'च्या निरीक्षणांवर 'इस्रो'चे संशोधन

तसेच, कोडिंग, रोबोटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय), इंटरनेट ऑफ थिंग्ज, ड्रोन, थ्रीडी प्रिंटिंग आणि अंतराळ विज्ञान व तंत्रज्ञान यांसारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानाची विद्यार्थ्यांना ओळख करून देण्याच्या केअर्सच्‍या योजनेच्या उद्दिष्टाला अधिक बळकटी मिळाली आहे.

तंत्रशिक्षण संचालनालयाने केअर्स योजना २०२१ मध्ये सुरू केली. योजनेचा ४४० हून अधिक सरकारी आणि सरकारी अनुदानित शाळांमधील ६५ हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना लाभ झाला असून, ६६० हून अधिक शिक्षक आणि ‘टीच फॉर गोवा फेलो’ना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

ISRO Registered Space Educator Goa
Isro Satellite Launch: इस्रोनं रचला नवा विक्रम! सर्वात वजनदार 'CMS-03' उपग्रह यशस्वीरित्या लॉन्च, भारतीय नौदलाची ताकद वाढणार Watch Video

मान्‍यतेमुळे राज्याला मिळणार ‘हे’ फायदे

‘इस्रोचे नोंदणीकृत अवकाश शिक्षक’ म्‍हणून मान्‍यता मिळाल्‍याने ‘पीएमयू’ला यापुढे अंतराळ शिक्षणाशी संबंधित जनजागृती कार्यक्रम, कार्यशाळा, तज्ज्ञांची व्याख्याने, नावीन्यपूर्ण आव्हाने, खगोलशास्त्राची सत्रे, विद्यार्थी प्रकल्प आणि उपग्रह तंत्रज्ञान, रिमोट सेन्सिंग, पृथ्वी निरीक्षण, रॉकेट्री व इतर उदयोन्मुख अंतराळ उपयोगांशी संबंधित प्रात्यक्षिके आयोजित करता येणार आहेत.

‘इस्रो’कडून मिळालेल्‍या या मान्यतेमुळे विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, संशोधन, एरोस्पेस आणि इतर वेगाने वाढणाऱ्या क्षेत्रांमधील भविष्यातील करिअरसाठी विद्यार्थ्यांना तयार करण्याच्या गोवा सरकारच्या कटिबद्धतेला अधिक बळकटी. हा उपक्रम राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० (एनईपी) शी सुसंगत असून अनुभवाधिष्ठित शिक्षण, वैज्ञानिक चौकस वृत्ती, चिकित्सक विचारसरणी, नावीन्य आणि बहुविद्याशाखीय शिक्षणावर भर देते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com