

बंगळूर: तीव्र सौरवादळांचा पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रावर कसा परिणाम होतो, याची नवी माहिती समोर आली आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) आदित्य एल-१ मोहिमेतील निरीक्षणांवरून सौरवादळांचे पृथ्वीवर होणारे परिणाम स्पष्ट झाले आहेत. तीव्र सौरवादळांमुळे पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रावर दाब निर्माण होतो आणि काही काळासाठी त्या क्षेत्राच्या संपर्कात असणाऱ्या भूस्थिर उपग्रहांच्या कामकाजावर परिणाम होतो, असे या संशोधनात म्हटले आहे.
‘अॅस्ट्रोफिजिकल’ या नियतकालिकात याविषयीचे संशोधन प्रसिद्ध करण्यात आले आहे. यामध्ये शास्त्रज्ञांनी ऑक्टोबर २०२४मधील सौर वादळांच्या निरीक्षणावर केलेल्या संशोधनाचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.
‘आदित्य एल-१’ ही भारताची पहिली सौर वेधशाळा आहे. त्याकडून मिळणाऱ्या माहितीबरोबरच अन्य आंतरराष्ट्रीय अवकाश मोहिमांमधून मिळणाऱ्या माहितीचीही मदत घेण्यात आली आहे.
भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) १२ जानेवारी रोजी ‘पीएसएलव्ही सी६२’ या मोहिमेमध्ये ‘ईओएस-एन१’ या पृथ्वी निरीक्षण उपग्रहाचे प्रक्षेपण करणार आहे. ‘न्यूस्पेस इंडिया’ या ‘इस्रो’च्या व्यावसायिक कंपनीची ही मोहीम असून, यामध्ये देशांतर्गत व विदेशातील ग्राहकांचे १३ उपग्रहही कक्षेत सोडण्यात येणार आहेत.
‘ईओएस-एन१’ हा उपग्रह थायलंड आणि ब्रिटनने संयुक्तपणे विकसित केला आहे. याशिवाय, प्रक्षेपणानंतर दोन तासांमध्ये स्पेनची ‘केआयडी’ ही कुपी पुन्हा पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करणार असून, हा प्रयोगही महत्त्वपूर्ण आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.