Goa Tourism: गोव्यात कार किंवा स्कूटी भाड्यानं घ्यायची? मग 'या' टिप्स वाचाच नाहीतर फसाल

Vehicle Rental Tips: गोवा हे भारतातील सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळांपैकी एक आहे. सुंदर समुद्रकिनारे, उत्साही नाईटलाईफ आणि रोमांचक वॉटर स्पोर्ट्स यामुळे दरवर्षी हजारो पर्यटक येथे भेट देतात.
Goa Vehicle Rental Tips
Goa Vehicle Rental TipsDainik Gomantak
Published on
Updated on

गोवा हे भारतातील सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळांपैकी एक आहे. सुंदर समुद्रकिनारे, उत्साही नाईटलाईफ आणि रोमांचक वॉटर स्पोर्ट्स यामुळे दरवर्षी हजारो पर्यटक येथे भेट देतात. गोव्यात फिरण्यासाठी सार्वजनिक वाहतूक मर्यादित असल्यामुळे अनेक पर्यटक वाहन भाड्याने घेण्याचा पर्याय निवडतात. मात्र, योग्य नियोजन नसेल तर भाड्यानं गाडी घेणं महागात पडू शकतं.

गोव्यात तुम्हाला स्कूटर, बाईक, कार आणि जीप भाड्याने मिळू शकतात.जर तुम्ही एकटे किंवा जोडप्यासोबत असाल, तर स्कूटर किंवा बाईक हा सर्वोत्तम पर्याय आहे.

कुटुंब किंवा मित्रांसोबत असाल तर कार भाड्याने घेणे जास्त सोयीस्कर ठरेल. जर तुम्हाला ऑफ-रोड किंवा बीचसाइड फिरायचे असेल, तर थोड्या मोठ्या वाहनाचा विचार करा. पण भाड्याने गाडी घेताना काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे.

Goa Vehicle Rental Tips
Hidden Places In Goa: ट्रॅव्हल लव्हर्ससाठी खास! गोव्यातील 'या' 4 अज्ञात ठिकाणांना नक्की भेट द्या!

व्हिडिओ रेकॉर्डिंग

गाडी घेतल्यावर व्हिडिओ रेकॉर्डिंग करा. कारण काही भाडेकरू नंतर चुकीचे दावे करू शकतात की तुम्ही वाहनाचे नुकसान केले आहे. आधीपासून असलेले स्क्रॅच, डेंट, किंवा ओरखडे स्पष्ट नोंदवले जातील. जर परत करताना कोणतीही समस्या उद्भवली, तर तुमच्याकडे पुरावा राहील.

पिवळ्या नंबर प्लेटची वाहनं

पिवळ्या नंबर प्लेट असलेली वाहने अधिकृतरित्या व्यावसायिक वापरासाठी नोंदणीकृत असतात. खाजगी (पांढऱ्या प्लेटची) वाहने व्यावसायिक भाड्यासाठी वापरणे कायदेशीर नाही. पिवळ्या प्लेटच्या वाहनांवर व्यावसायिक इन्शुरन्स लागू असतो, त्यामुळे अपघात झाल्यास संरक्षण मिळते.

Goa Vehicle Rental Tips
Goa University: पेपर चोरी प्रकरण! बनावट चाव्या बनवूनच प्रश्नपत्रिकांची चोरी; विद्यापीठाची कबुली; परीक्षा परत होणार का? संभ्रमावस्था

डीलर

गोव्यात वाहन भाड्याने घेताना अधिकृत आणि विश्वासार्ह डीलर निवडणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ते परवडणाऱ्या दरात विविध प्रकारच्या कार आणि बाईक उपलब्ध करून देतात.

टेस्ट ड्राइव्ह

गोव्यात वाहन भाड्याने घेताना एक छोटीशी टेस्ट ड्राइव्ह घेणे खूप महत्त्वाचे आहे. यामुळे वाहनाची स्थिती आणि कार्यक्षमता तपासण्यास मदत होते.

Goa Vehicle Rental Tips
Goa Cabinet Reshuffle: अस्वस्थता वाढली! मंत्रिमंडळ फेरबदल कधी? आमदारांना प्रतीक्षा अधिवेशनाची; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांचे मौन

पेमेंटचा पुरावा

गोव्यात वाहन भाड्याने घेताना पेमेंटचा पुरावा ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. काही वेळा गैरसमज किंवा वाद उद्भवू शकतात, त्यामुळे स्क्रीनशॉट किंवा पावती ठेवल्यास भविष्यातील समस्या टाळता येतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com