Hidden Places In Goa: ट्रॅव्हल लव्हर्ससाठी खास! गोव्यातील 'या' 4 अज्ञात ठिकाणांना नक्की भेट द्या!

Sameer Amunekar

गोवा म्हटलं की बीच, नाईटलाइफ आणि प्रसिद्ध पर्यटनस्थळे आठवतात, पण गोव्यात अशीही काही ठिकाणे आहेत जी अजूनही बऱ्याच लोकांना माहीत नाहीत. ट्रॅव्हल लव्हर्ससाठी खास अशी 4 लपलेली ठिकाणे जाणून घेऊया.

Hidden Places In Goa | Dainik Gomantak

हरवळे लेणी

हरवळे लेणी हे गोव्यातील एक ऐतिहासिक ठिकाण आहे. या लेण्यांना पांडव लेणी असेही म्हटले जाते, कारण असे मानले जाते की पांडवांनी आपल्या अज्ञातवासाच्या काळात येथे काही काळ आश्रय घेतला होता.

Hidden Places In Goa | Dainik Gomantak

शिव दगडी मुख

शिव दगडी मुख हे एक नैसर्गिकरित्या तयार झालेले दगडी संरचनात्मक स्वरूप आहे, जे शिवाच्या मुखासारखे दिसते. त्यामुळे स्थानिक लोकांनी याला शिव दगडी मुख असे नाव दिले आहे. इथे नैसर्गिक दगडाच्या रचनेमध्ये शिवाच्या चेहऱ्यासारखा आकार दिसतो.

Hidden Places In Goa | Dainik Gomantak

बबल्स लेक

गोव्यातील एक अद्वितीय आणि रहस्यमय ठिकाण म्हणजे नेत्रावली येथील बबलिंग लेक. या तलावाच्या पाण्यातून लहान लहान बबल्स सतत वर येताना दिसतात, जे पाहण्यास अत्यंत रोचक वाटते.

Hidden Places In Goa | Dainik Gomantak

सिक्रेट हिल्स

गोवा फक्त बीचेस आणि पार्टीसाठी प्रसिद्ध नसून इथे काही अप्रतिम आणि शांत डोंगराळ भागही आहेत. साउथ गोवा हे अशा काही सिक्रेटहिल्स साठी ओळखले जाते, जिथे गर्दीपासून दूर जाऊन निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवता येतो.

Hidden Places In Goa | Dainik Gomantak

शांतता आणि निसर्ग

गोव्याच्या गजबजाटापासून काही वेळ शांतता आणि निसर्ग अनुभवायचा असेल, तर या ठिकाणांना भेट देऊ शकता.

Hidden Places In Goa | Dainik Gomantak
Famous Club In Goa | Dainik Gomantak
पार्टिसाठी गोव्यातील बेस्ट ठिकाणं