Goa University: पेपर चोरी प्रकरण! बनावट चाव्या बनवूनच प्रश्नपत्रिकांची चोरी; विद्यापीठाची कबुली; परीक्षा परत होणार का? संभ्रमावस्था

Goa University Professor Paper Leak Scam: प्रश्नपत्रिकांची चोरी करून एका विद्यार्थिनीला चांगले गुण मिळवण्यास मदत केल्याचे प्रकरण घडल्याचे गोवा विद्यापीठाने अखेर मान्य केले आहे.
Goa University
Goa UniversityDainik Gomantak
Published on
Updated on

Goa University News

पणजी: प्रश्नपत्रिकांची चोरी करून एका विद्यार्थिनीला चांगले गुण मिळवण्यास मदत केल्याचे प्रकरण घडल्याचे गोवा विद्यापीठाने अखेर मान्य केले आहे. कुलसचिव सुंदर धुरी यांनी आगशी पोलिसांत केलेल्या तक्रारीत याचा स्पष्टपणे उल्लेख केला आहे.

याप्रकरणी राज्य सरकारने निवृत्त न्यायमूर्ती आर. एम. एस. खांडेपारकर यांच्या नेतृत्वाखाली नेमलेली चौकशी समिती आता कशाची चौकशी करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या समितीने प्रश्नपत्रिका प्राध्यापकांच्या कक्षात ठेवल्या जाव्यात का, प्रश्नपत्रिका फुटू नयेत यासाठी कोणती उपाययोजना केली जावी, बनावट चाव्या तयार केल्या तर त्या कशा तयार केल्या, यासाठी संबंधित प्राध्यापकाने त्या चाव्या विद्यापीठाबाहेर कशा नेल्या याची चौकशी झाली पाहिजे, असे विद्यापीठातील सूत्रांचे म्हणणे आहे.

काहींनी तर असे हे एकच प्रकरण आहे का आणखीन काही विभागांत असे प्रकार घडण्यासारखी स्थिती आहे, याचीही चौकशी केली पाहिजे, असे आग्रही मत व्यक्त केले. याप्रकरणी सरकारने स्थापन केलेल्या समितीसमोर कुलगुरू प्रा. हरिलाल मेनन हजर होणार का, अशा प्रश्नही चर्चेत आला आहे. कुलगुरूंनी येण्यास नकार दिला तर पुढे काय, अशी विचारणा केल्यावर माहीतगार सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कुलगुरू हे प्रकरण फारसे ताणणार नाहीत.

सराईतासारखे कांड; विद्यापीठाची कबुली

पोलिसांत दिलेल्या तक्रारीत बनावट चावीने त्या प्राध्यापकाने इतरांचे कक्ष उघडले, असे म्हणून हे प्रकरण फारच गंभीर असून चावी मिळवून कक्ष उघडण्यापुरते नाही, तर सराईत गुन्हेगारासारख्या बनावट चाव्या तयार करवून घेऊन हे कांड केल्याची कबुली विद्यापीठाने दिली आहे. एका विद्यार्थिनीला निकालात मदत केल्याचे नमूद करून विद्यापीठाने अप्रत्यक्षपणे त्या विद्यार्थिनीसाठीच प्रश्नपत्रिका फोडण्याचे साहस केल्याचे मान्य केले आहे.

प्रणव नाईकची नोंदविली जबानी

गोवा विद्यापीठाचा साहाय्यक प्राध्यापक प्रणव नाईक याची आज आगशी पोलिस ठाण्यात पाच तास चौकशी करण्यात आली. तो तपासात सहकार्य करत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्याला पुन्हा सोमवारी चौकशीसाठी बोलावले आहे. पोलिसांनी त्याचे कॉल डिटेल्स मागवले आहेत. त्याच्याविरोधात गोवा विद्यापीठाने पोलिसांत तक्रार दिली आहे.

अहवालाबाबत कुलगुरू-कुलपतींचे एकमत

त्यातही संबंधित साहाय्यक प्राध्यापक हा गोमंतकीय असल्याने त्याला वाचवण्याची सध्या विद्यापीठात सत्तेवर असलेल्या लॉबीची मानसिकता नाही. त्यामुळे विद्यापीठाने स्थापन केलेल्या चौकशी अहवालात कुलगुरूंनी हस्तक्षेप केला नाही आणि आहे तसा अहवाल राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांना कुलपती या नात्याने सादर केला. राज्यपालांनीही यात फारसा रस न दाखवता आपल्या कार्यालयाला कायद्यानुसार जे काही करायचे आहे ते करा, असा निरोप दिला.

Goa University
Goa University: विद्यापीठातले 'पेपरचोरी' प्रकरण हिमनगाचे टोक! राष्ट्रीय स्तरावर आपण पिछाडीवर का? याचा विचार करायला हवा..

निकालाचा फेरविचार करणार का?

प्रश्‍नपत्रिका चोरीचे प्रकरण विद्यापीठाने मान्य केल्याने आता विद्यार्थिनीला मदत केल्याचे सिद्ध झाल्यास त्या निकालाचा विद्यापीठ फेरविचार करणार का? यामुळे इतर विद्यार्थी-विद्यार्थिनींना परत परीक्षा देण्यास भाग पाडले जाणार का? प्राध्यापकांच्या कक्षांच्या चाव्यांची सुरक्षितता कशी राखणार? प्रश्नपत्रिका तयार केल्यानंतर परीक्षेच्या वेळेपर्यंत त्यांची गोपनीयता राखण्यासाठी काय करणार? असे अनेक प्रश्न यातून निर्माण झाले आहेत.

Goa University
Goa University: पेपर चोरी प्रकरण! साहाय्यक प्राध्यापक डॉ. प्रणव नाईक यांच्याविरोधात गुन्हा नोंद

वेगळी मार्गदर्शक तत्त्वे आखणार?

सूत्रांनी सांगितले, की पोलिस आता पेपर फुटीची चौकशी सुरू करतील. त्याचवेळी खांडेपारकर समितीही त्याच विषयावरून चौकशीला सुरुवात करील. खांडेपारकर समिती उच्चस्तरीय असल्याचे सरकारने म्हटले आहे. त्यामुळे त्यांना चौकशीसाठी वेगळी मार्गदर्शक तत्त्वे आखून देणार काय, असा प्रश्‍न विचारला जातो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com